- जाहिरात -spot_img
breaking news

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला ८ कोटी ५० लाखांचा ढोबळ नफा; चेअरमन संजय कडूस यांची माहिती

सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची संचालक मंडळाची शिफारस
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्हापरिषद कर्मचारी सोसायटीला सन २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षामध्ये ८ कोटी ५० लाख रुपयांचा ढोबळ नफा झालेला असून आवश्यक त्या तरतुदी रक्कम रुपये ४ कोटी ४० लाख रुपये वजा जाता संस्थेस ४ कोटी १० लाख निव्वळ नफा झालेला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संजय कडूस यांनी दिली. तसेच या नफ्यातून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन कडूस यांनी सांगितले की, मार्च २०२६ अखेर संस्थेची सभासद संख्या २७२६ असून संस्थेचे वसूल भाग भांडवल २७ कोटी १७ लाख, फंड्स २० कोटी ७२ लाख, ठेवी १९४ कोटी ८० लाख, सभासदांना कर्ज वाटप १७९ कोटी ४८ लाख असून अहवाल सालात सभासद कल्याण निधी मधून विवाह भेट योजने अंतर्गत ५८ सभासदांच्या पाल्यास संस्थेने धनादेशाव्दारे प्रत्येकी ५ हजार रुपये विवाह भेट योजनेचा लाभ देण्यात आहे. त्यासाठी एकूण २ लाख ९० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच सभासद कुटूंब आधार विमा योजने अंतर्गत २ मयत सभासदांचे कायदेशीर वारसास रुपये १५ लाख प्रमाणे एकूण ३० लाख रुपये लाभ देण्यात आला. २ मयत सभासदांच्या वारसांना १० लाख प्रमाणे एकूण २० लाख रुपये अपघात विमा पॉलीसीचा लाभ देण्यात आला. संस्थेच्या सभासदांसाठी सन २०२६-२०२७ या साला करीताही १० लाखाची अपघात विमा पॉलीसी घेतलेली आहे. सभासद कर्ज मर्यादा २० लाख असून सभासदांच्या मुदत ठेवीवर ८ टक्के व्याजदर दिल्यामुळे संस्थेच्या ठेवीत वाढ होऊन कॅश क्रेडीट कमी झालेले आहे. तसेच सभासदांच्या कायम ठेवीवर ९ टक्के व्याज दिले आहे. तसेच कर्जावरील व्याजदर ९ टक्के आहे. संचालकांनी खर्चात काटकसर करून आणि आवश्यक त्या तरतुदी करून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली असल्याचे चेअरमन कडूस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारनेरच्या डॉक्टरला फासले काळे! गळ्यात घातला चपलांचा हार...

७ जून ला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा मानस
संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत झालेल्या चर्चेअंती संस्थेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ७ जून २०२६ रोजी घेण्याचा मानस असल्याचे व्हाईस चेअरमन अर्जुन मंडलिक यांनी सांगितले. मागील वर्षाप्रमाणे लाभांश व व्याजाची रक्कम सभेच्या दुसऱ्या दिवशी सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या वार्षिक सभेत सभासदांच्या विशेष गुणवत्ता प्राप्त मुला-मुलीना पारितोषिक, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार असून यासाठी सभासदांनी पारितोषिकासाठी आपल्या गुणवंत पाल्यांची नावे १५ मे २०२६ पर्यंत जमा करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, श्रीमती सुरेखा महारनूर, श्रीमती मनिषा साळवे, अभिजित पवार, चेतन चव्हाण, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ