- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमानंतर राडा, विवाहितेचा छळ, जुन्या वादातून तरुणाला धमकी…

एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरात घुसून तोडफोड
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
शहरातील निर्मलनगर परिसरामध्ये हळदीच्या कार्यक्रमानंतर जुन्या वादातून घरात घुसून मारहाण आणि तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांसह इतर पाच ते दहा जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण विष्णू तांबे यांनी या संदर्भात पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण तांबे हे गोविंद राम इंगळे यांच्याकडील हळदीचा कार्यक्रम संपवून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. त्यावेळी आरोपी गोविंद राम इंगळे, गोपाल राम इंगळे, जय चंद्रकांत इंगळे आणि गणेश राम इंगळे यांनी त्यांच्या इतर पाच ते दहा नातेवाईक व मित्रांसह तांबे यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी घरातील सदस्यांना बाजूला ढकलून देण्यात आले, ज्यामध्ये फिर्यादी यांच्या मुलीचा चष्मा फुटून नुकसान झाले. घटनेनंतर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि पोलीस अंमलदार पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

विवाहितेचा छळ
अहिल्यानगर: सावेडी भागातील निर्मलनगर परिसरात राहणार्‍या एका २८ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी आणि विविध कारणांवरून शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला सावेडी येथील गाडेकर चौक परिसरात वास्तव्यास आहे. तिचा विवाह नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी तिला माहेरून फ्लॅट घेण्यासाठी आणि फ्लॅटच्या वास्तूशांतीसाठी पैसे आणण्याची मागणी सुरू केली. या कारणावरून तिला वेळोवेळी शिवीगाळ व बेदम मारहाण करून अत्यंत त्रास देण्यात आला.छळाची परिसीमा गाठत पीडित महिलेच्या बँक खात्यातून तिच्या पतीने स्वतःच्या खात्यावर सुमारे ४८ हजार रुपये वर्ग करून घेतले. एवढेच नव्हे तर तिच्याकडील रोख १५ हजार रुपये आणि मुलाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेण्यात आले. पीडितेला घरातून हाकलून देण्यात आले. नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या काळात हा छळ सुरू होता.

हे सुद्धा वाचा :  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार!; अहिल्यानगरमध्ये कुठे घडली घटना पहा...

जुन्या वादातून तरुणाला धमकी
अहिल्यानगर: शहरातील भिंगार परिसरात असलेल्या वडार वाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डिया टिपावत काळे याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौर्य विलास चव्हाण या २५ वर्षीय तरुणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शौर्य चव्हाण हा मजुरी काम करतो. १५ मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो वडार वाडी परिसरात असताना आरोपी डिया काळे याने त्याला गाठले. यावेळी दोघांमध्ये जुन्या वादातून पुन्हा बाचाबाची झाली. रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीला विनाकारण अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की, आरोपीने जवळच असलेला दगड हातात घेऊन शौर्यच्या डोयात मारला, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. मारहाण केल्यानंतर आरोपीने शौर्यला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर जखमी शौर्यने सिव्हिल रुग्णालय गाठून उपचार घेतले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ