- जाहिरात -spot_img
breaking news

आमदार दाते यांचे राजकारण विश्वासघातकी..कोणी केला आरोप

भाजप जिल्हा चिटणीस अतुल मानेंचा भाजप कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावरून घणाघात

पारनेर | नगर सह्याद्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कृपाशीर्वादाने निवडून आल्याने किमान महायुतीचा धर्म पाळून भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देताना विचारपूर्वक राजकारण करावे, असा सल्ला भाजपचे जिल्हा चिटणीस अतुल माने यांनी आमदार काशिनाथ दाते यांना दिला आहे.

अळकुटी येथील भाजप कार्यकर्त्यांचा आमदार दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश समारंभ झाला. या प्रवेशावर माने यांनी टीकात्मक टिपण्णी केली आहे.
अळकुटी येथील कार्यकर्त्यांना आमदार दाते यांनी विकासकामांचे आश्वासन देऊन प्रवेश देण्यासाठी भाग पाडले आहे. पारनेर तालुक्यात जे विकासकामे होतात ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचा विसर आ. दाते यांना पडला आहे का? असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला आहे.

आपण महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर निवडून आलो आहे, याचे भानही ते विसरले आहेत. माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघात लक्ष दिले नसते तर आमदार दाते यांची काय परिस्थिती असती याची जाण ते विसरले आहेत. युतीचा धर्म पाळायचा असे धोरण महायुतीमध्ये राज्यात, जिल्ह्यात तसेच तालुक्यात सर्वानुमते ठरले असून ना. विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपची परिस्थिती तालुक्यात भक्कम आहे. मात्र, दाते हे युतीचा धर्म न पाळता इतर पक्षात काड्या करण्याचे काम करतात, हे अळकुटी येथील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावरून सिद्ध झाले आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युतीचा धर्म न पाळल्यास दाते यांना पळताभुई थोडी होईल याची माहिती असूनही ते विखे यांची खोड करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विखे यांच्यामुळे भले भले नेते भुईसपाट झाले हा इतिहास दाते विसरले आहेत का? गेली पंचेचाळीस वर्षे राजकारण करताना इतरांचे भोई म्हणून तुम्ही काम केले, मात्र कालच्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांचा आशीर्वाद तुम्हाला असल्याने तुम्ही निवडणूक जिंकलात हे गेली दीड वर्षातच विसरले की काय? हवेत जाऊ नका नाही तर हवेतच राहाल आणि पुन्हा माजी झाला तर तुमची अवस्था इतर माजीपेक्षा अवघड होईल, असा इशारा माने यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेरच्या उत्तर भागात निसर्गाचा कोप ; तुफान वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; बळीराजा पुरता कोलमडला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ