- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक घटना; पोलीस मुख्यालयात हँडग्रेनेड हातातच फुटले, चार पोलीस जखमी, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता म्हणून घेतल्या जाणाऱ्या मॉक ड्रिल दरम्यान अहिल्यानगरमध्ये मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयात प्रात्यक्षिके सुरू असताना अचानक हँड ग्रेनेडचा (हातबाँब) स्फोट झाला. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणाथ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोणतीही आणीबाणीची किंवा घातपाताची परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे रक्षण कसे करावे, गोंधळ न उडवता परिस्थिती कशी हाताळावी, याचे धडे देण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीने नियमितपणे मॉक ड्रिलफ अर्थात प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. अहिल्यानगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अशाच एका मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण आणि माहिती देणे सुरू असतानाच, अचानक एका हँड ग्रेनेडचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका अनपेक्षित होता की उपस्थित कर्मचाऱ्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणाथ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा ग्रेनेड अगदी जवळ असल्याने दोन कर्मचाऱ्यांच्या हाताची करंगळी तुटली आहे, तर इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेनंतर तातडीने धावपळ करून जखमी कर्मचाऱ्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सुदैवाने, सर्व जखमी कर्मचाऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?
मॉक ड्रिल हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असताना हॅन्ड ग्रेनाईड हातात फुटल्याने चार कर्मचारी जखमी झाले. पोलीस मुख्यालयातच ही घटना घडली. पोलीस कर्मचारी हातात हँड ग्रेनाईड घेऊन माहिती देत होते. ही माहिती देत असतानाच अचानक हँड ग्रेनाईडचा स्फोट झाला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात चारजण जखमी झाले. दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे. पण दोघांची करंगळी तुटून पडली आहे.

हे सुद्धा वाचा :  दैनिक नगर सह्याद्रीच्या कार्यकारी संपादकपदी सुनील चोभे, निवासी संपादकपदी मुरलीधर तांबडे

दोन पोलीस कर्मचाऱ्यांची करंगळी तुटली
आमचा मॉक ड्रिलचा डेमो सुरू होता. आमच्या हातात ग्रेनाईड होते. ते कसे फोडायचे? काय करायचे? हे काहीच आम्हाला सांगितलं नव्हतं. ऑर्डर आल्यावर पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला. माझी करंगळी तुटली. डोळ्यात धूर गेला, असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. दुसऱ्या एका जखमी कर्मचाऱ्यानेही याची माहिती दिली. आमच्याकडे ग्रेनाईड होते. आम्हाला त्याची माहिती आम्हाला नव्हती. सूचना होत्या. पण संपूर्ण सूचना दिल्या नव्हत्या. या स्फोटात माझी करंगळी तुटून पडली आहे, असे या जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ