१४ जूनला होणार वितरण
अहिल्यानगर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून बालरंगभूमी क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा मानाचा पुरस्कार यंदा अहिल्यानगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेविका व रंगकम डॉ. सुधा कांकरिया यांना जाहीर करण्यात आला.दरवर्षी 14 जून रोजी नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांना ही पुरस्कार दिले जातात.
राज्यस्तरीय कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा या माध्यमातून मुलांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, कलात्मकता आणि सामाजिक भान रुजविण्यासाठी डॉ. सुधा कांकरिया यांनी 25 वर्षे केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती नाट्यपरिषद मध्यवतचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. त्यांच्या कार्यामुळे बाल कलाकारांना नवे आयाम लाभले असून, अनेक बालकलाकारांना योग्य व्यासपीठ मिळाले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखा यांच्यावतीने डॉ. सुधा कांकरिया यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मध्यवत शाखेने तत्काळ मान्यता देत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी डॉ. प्रकाश कांकरिया, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, अमोल खोले, कार्याध्यक्ष पी.डी. कुलकण, सहकोषाध्यक्ष शिरीष जोशी, उपाध्यक्ष प्रशांत जठार, शैलेश देशमुख, स्नेहा रानडे, जयंत येलुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉ. सुधा कांकरिया यांना पुढील वाटचालीसाठी परिषदेच्या वतीने शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.कला, साहित्य आणि संस्कार यांच्या सुंदर संगमातून समाज घडविणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे ही संपूर्ण रंगभूमीसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आली.










