- जाहिरात -spot_img
breaking news

शिरापूरला ‌गावठी दारूअड्ड्यांवर छापे

दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील शिरापूर परिसरात अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगर विभागाने टाकलेल्या या धाडीत सुमारे 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच नष्ट केला. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शिरापूर येथील गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणांवर अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान 3 हजार 600 लिटर रसायन (कच्चा माल) आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सर्व साहित्याची बाजारातील किंमत 2 लाख 3 हजार रुपये असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा संपूर्ण मुद्देमाल अधिकाऱ्यांनी जागेवरच नष्ट केला.ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त राजेश देशमुख, पुणे विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर, अहिल्यानगर-1 चे अधीक्षक प्रमोद सोनोने आणि उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत क-विभागाचे निरीक्षक सी. एस. रासकर, दुय्यम निरीक्षक उमेश ढोले, महेंद्र साळवे तसेच जवान दिलीप पवार, नेहाल उके, जिया पठाण, निलेश बुरा आणि वाहन चालक संपत बिटके यांनी सक्रिय सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा :  राहुरीचा सस्पेन्स संपला; विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ