- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य १५ जून २०२६

आजचा दिवस मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशीसाठी अतिशय लाभदायक आणि भाग्याचा ठरणार आहे.
सोमवती अमावस्या आणि विविध शुभ योगांमुळे या राशींच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील.

मिथुन : करिअरमध्ये प्रगती होईल आणि महत्त्वाचे व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतात .

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन नोकरीच्या संधी मिळतील.

वृषभ : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.

कर्क : कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी उत्तम संधी उपलब्ध होतील.

सिंह : आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. नोकरी आणि व्यवसायात संयम बाळगणे गरजेचे आहे.

तूळ: वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सुसंवाद साधा. अचानक धनलाभाची शक्यता असून आरोग्याच्या समस्या कमी होतील.

वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक स्थिती राहील.

धनु : तुमची एखादी अपूर्ण इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आर्थिक क्षेत्रात धाडस करण्यास हरकत नाही.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल आणि मुलांचे प्रश्न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येतील

मीन : रखडलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण करू शकाल. भागीदारीतील व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  विखे फॅक्टर मुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! : आ. प्राजक्त तनपुरे, नेमकं काय म्हणाले पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ