- जाहिरात -spot_img
breaking news

महाराष्ट्रात नवा राजकीय पॅटर्न; शिंदेसेना आणि काँग्रेस एकत्र, तटकरेंना धक्का

मुंबई / नगर सह्याद्री –
रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायत येथे मोठे सत्तांतर घडले असून शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्षपदावर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. १७ पैकी ९ जागांवर बहुमत मिळवत शिंदेसेनेने नगरपंचायतीवर भगवा फडकवला. या विजयामुळे सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने ही सत्ता हस्तगत केली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून जंजिरकर, तर राष्ट्रवादीकडून सुनील शेडगे रिंगणात होते.

निकालानंतर शिंदेसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष साजरा केल्याने रायगडमध्ये नवा राजकीय पॅटर्न चर्चेत आला आहे. आगामी काळात श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सत्ता स्थापन होताच नगराध्यक्षांच्या केबिनमधील सुनील तटकरे यांचा फोटो हटवण्यात आला. त्याऐवजी बाळासाहेब ठाकरे आणि A. R. अंतुले यांचे फोटो लावण्यात आले. या घडामोडींमुळे रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ