- जाहिरात -spot_img
breaking news

‘त्या’ आरोपींना शेवगावमधून कायमचे हद्दपार करा; आ. जगताप आक्रमक, काय म्हणाले पहा…

शेवगाव येथील हिंदू जनआक्रोश मोर्चा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
ज्या जिहादी प्रवृत्तीमुळे हिंदू भगिनीला जीव गमवावा लागला, त्या मुख्य आरोपीला तर शिक्षा होईलच; पण या गुन्ह्यात पडद्यामागून साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची नावे शोधून त्यांना शेवगावमधून कायमचे हद्दपार करा. अशा प्रवृत्तींना या मातीत राहण्याचा किंवा मृत्यूनंतर इथे दफन होण्याचाही अधिकार नाही असा कडवट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सोहेल शेख याने एका अल्पवयीन हिंदू मुलीला धर्मांतरण करून लग्नासाठी दबाव टाकल्या कारणाने मुलीने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाज, शेवगावच्या वतीने बुधवारी भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान उपस्थित प्रमुख वक्त्‌‍यांनी आरोपींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, पीडित चिमुकलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला केवळ सामान्य शिक्षा न होता थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. लव्ह जिहाद आणि धर्मांतराविरोधातील हा लढा केवळ या मोर्चापुरता मर्यादित नसून तो पुढेही असाच सुरू राहील. तसेच शेवगाव परिसरातील अवैध गुटखा विक्री आणि इतर बेकायदेशीर धंदे, जे या समाजकंटकांकडून चालवले जातात, त्यावर प्रशासनाने तात्काळ पूर्ण बंदी घालावी.

नानासाहेब वाघमारे म्हणाले, लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून आपल्या अनेक हिंदू मुलींना जीव गमवावा लागत आहे. आता फक्त मोर्चे काढून थांबण्याची वेळ राहिलेली नाही, तर अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
सागर बेग म्हणाले, राष्ट्रीय श्रीराम संघटनेच्या वतीने पीडित कुटुंबाला आधार म्हणून 51,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. तसेच सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमार्फत पीडित कुटुंबाला जीवनावश्यक किराणा सामग्री घरपोच देऊन मदत सुरू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  संगमनेर तालुक्यात अवकाळी पाऊस; आमदार अमोल खताळ यांनी केली ही मागणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ