- जाहिरात -spot_img
breaking news

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; ऐन लग्नसराईत चांदीही झाली स्वस्त

मुंबई / नगर सह्याद्री –
ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी खरेदीदारांची गर्दी असते. लग्नसराईत सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. दरम्यान, आज सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे भाव ६००० रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोन्याचे दर घसरल्याने आज सोने खरेदीची तुमच्याकडे संधी आहे. सोन्यासह चांदीचेही दर घसरले आहेत. दरम्यान, आजचे सोने-चांदीचे दर वाचा.

२४ कॅरेटचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५२,९५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२२,३६० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६००० रुपयांची घसरण झाली असून १५,२९,५०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर
सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४०,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४४० रुपयांनी घसरण होणार आहे. हे दर १,१२,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ५,५०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १४,०२,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर
१८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,१४,७१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३६० रुपयांनी घसरले असून हे दर ९१,७६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ४५०० रुपयांनी स्वस्त झालं असून ११,४७,१०० रुपये किंमत झाली आहे.

चांदीचे दर
आज चांदीच्या दरातदेखील किंचिंत घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १ किलोमागे फक्त १०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर २,५९,९०० रपये झाले आहेत. १०० ग्रॅममागे सोन्याचे दर १० रुपयांनी घसरले असून हे दर २५,९९० रुपये झाले आहेत.

हे सुद्धा वाचा :  खासगी शाळांत राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी; तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ