- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरीचा सस्पेन्स संपला; विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

राहुरी / नगर सह्याद्री –
Rahuri Bypoll Election : दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणुक होणार आहे. यासाठी भाजपकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय कार्डिले यांना राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी सुरूवातीपासूनच अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती. शेवटी भाजपाने अक्षय कर्डिले यांनाच तिकिट दिले. वडिलांच्या जागी आता अक्षय कर्डिले निवडणूक लढवतील.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. सुजय विखे पाटील यांनी आपल्याला तिकिट मिळण्याकरिता अनेक प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

शिवाजीराव कार्डिलेंची राजकीय कारकीर्द
गेल्यावर्षी 17 ऑक्टोबर रोजी शिवाजीराव कार्डिले यांचे निधन झाले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून शिवाजीराव कर्डिले यांचे ओळख होती. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. राहुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग अनेक वर्षे आपले वर्चस्व कायम राखले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली.

शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत विजय मिळवला, पण 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची व बारामती या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर 4 मेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

हे सुद्धा वाचा :  टाकळी ढोकेश्वर परिसरात पाणीटंचाई; वाढीव पाणीटँकरची मागणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ