- जाहिरात -spot_img

ढवळपुरी लैंगिक अत्याचार प्रकरण; यशवंत थोरात बाबत कोर्टाचा मोठा निर्णय…

पारनेर | नगर सह्याद्री
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या ढवळपुरी येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी यशवंत थोरात महाराज याला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (पॉक्सो विशेष न्यायालय), अहिल्यानगर यांनी थोरात याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

फिर्यादीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत असतानाच आरोपीने तिच्यावर प्रथम लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अनेक वर्षे विविध प्रकारे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच अत्याचारादरम्यान पीडितेला पक्कडीने चटके दिल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आरोपीला अटक झाल्यानंतर त्याने 9 जून 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 14 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश (पॉक्सो विशेष न्यायालय) एम. एच. शेख यांच्या समोर युक्तिवाद झाला. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी अटक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करत जामीन मंजूर करण्याची मागणी केली. मात्र पीडितेच्या वतीने ऍड. हृषीकेश शिंदे यांनी जोरदार विरोध करत यापूव याच आरोपीवर वावी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारच्या गंभीर आरोपांनंतरही आरोपीला कायद्याची भीती उरलेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. एम. पी. केळगंद्रे यांनी दोषारोपपत्रासोबत जोडलेल्या वैद्यकीय अहवालातील पीडितेच्या शरीरावरील जखमा व बर्न इन्ज्युरींची माहिती न्यायालयासमोर मांडली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, प्रकरणाचे गांभीर्य, पीडितेचे वय, उपलब्ध पुरावे तसेच गुन्ह्याचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी आरोपी यशवंत थोरात महाराज याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.याप्रकरणात पीडितेला कायदेशीर सहकार्य म्हणून ऍड. हृषीकेश शिंदे, ऍड. प्राजक्ता करंडे, ऍड. प्रवीण आदमाने आणि ऍड. विजया कोतकर यांनी काम पाहिले. तपास पोलीस निरीक्षक गडकरी व पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरमध्ये संगम तरुण मंडळाची 5001 गोवर्‍यांची आकर्षक होळी
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com