- जाहिरात -spot_img
breaking news

खुशखबर! मान्सून वेळेपूर्वीच धडकणार! ‘स्कायमेट’चा काय आहे अंदाज पहा

मुंबई । नगर सह्याद्री –
राज्यात सध्या भीषण उन्हाळा आणि अंगाची लाहीलाही करणारा उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा मान्सून अंदमानात आपल्या ठरलेल्या वेळेच्या आधीच धडकण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान संस्था ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळाला असून लवकरच अंदमान निकोबार बेटांवर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती
हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार असून मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मोठी चालना मिळेल. यापूर्वी मान्सूनचे आगमन १४ ते २२ मे दरम्यान होईल असा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्हे गडद झाली आहेत. भारतीय हवामान विभागानेही १४ ते २० मे दरम्यान अंदमान समुद्रात नैर्ऋत्य वारे सक्रिय होतील, असा दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्रातील आगमनाचे समीकरण
साधारणपणे, मान्सून दाखल एकदा अंदमानात झाला की तिथून कोकणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे २१ दिवसांचा कालावधी लागतो. जर अंदमानात मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली, तर महाराष्ट्रातही यंदा पावसाचे आगमन वेळेवर किंवा काही दिवस आधीच होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भीषण उकाड्याने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रवासीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा :  ताजनापूर योजनेस 250 कोटी रुपयांचा निधी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ