- जाहिरात -spot_img
breaking news

नाशिकच्या लाल मातीत पारनेरचा डंका; चेतन रेपाळे ‘तपोवन हनुमान केसरी’चा मानकरी

पारनेर | नगर सह्याद्री
नाशिक येथील तपोवन परिसरात २ एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘तपोवन हनुमान केसरी’ कुस्ती स्पर्धेत पारनेर तालुयाचा सुपुत्र पै. चेतन रेपाळे याने घवघवीत यश संपादन केले. अंतिम लढतीत कोल्हापूरच्या सुशांत तांबोळकरचा पराभव करत चेतनने ‘तपोवन हनुमान केसरी २०२६’ हा किताब आणि मानाची चांदीची गदा आपल्या नावावर केली.

ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांनुसार विविध वजन गटांत पार पडली. महिला कुस्तीगीरांच्या लढती प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या. पुरुषांच्या खुल्या गटात राज्यातील तब्बल ३२ कसलेल्या मल्लांनी सहभाग नोंदवला होता. दिवसभर चाललेल्या अटीतटीच्या लढतीनंतर अंतिम फेरी पारनेरचा चेतन रेपाळे आणि कोल्हापूरचा सुशांत तांबोळकर यांच्यात रंगली. अंतिम लढतीत चेतनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सुशांतवर ५-२ अशा गुणांनी मात केली. या विजयाबद्दल पै. चेतनला १ लाख १ हजार रुपये रोख आणि मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.

गेल्या महिन्यात वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने तिसर्‍या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याची गेल्या दोन वर्षांतील प्रगती पाहता, तो लवकरच ’महाराष्ट्र केसरी’ आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता होईल, असा विश्वास कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.या स्पर्धेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी पै.हर्षवधन सदगिर यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन माजी खासदार हेमंत गोडसे, रोहन देशपांडे आणि उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. उत्तम दळवी यांनी केले होते.

विजेत्यांचा सत्कार हेमंत गोडसे, विजय कळसकर, रवींद्र मोरे, सूर्यकांत लोटे आणि मधुकर वाघ यांच्याहस्ते करण्यात आला. पै. चेतनच्या या यशात वस्ताद नगरसेवक पै. युवराज पठारे, पै. कुंडलिक पठारे, पै. बाळासाहेब पठारे, पै. यशवंत पठारे, पै. धनंजय खर्से, पै. शंकर खोसे आणि कोच पै. नितीन पवार व पै. शामलाल भारतवाज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयामुळे पारनेर तालुयासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा :  अकरावी प्रवेशाचा पुढचा टप्पा सुरु ; २६ मे २०२६ रोजी पहिली यादी होणार जाहीर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ