- जाहिरात -spot_img
breaking news

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारनेरच्या डॉक्टरला फासले काळे! गळ्यात घातला चपलांचा हार…

तालुक्यात संतापाची लाट; डॉ. मंगेश बेकारसेच्या तोंडाला फासली शाई
​पारनेर / नगर सह्याद्री –
सोशल मीडियावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल अपमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील डॉक्टर डॉ. मंगेश बेकारसे याच्याविरोधात संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विकृत मानसिकतेचा निषेध करत संतापलेल्या भीमसैनिकांनी संबंधित डॉक्टरच्या तोंडाला शाई फासून, त्याला चपलांचा हार घालत चांगलाच धडा शिकवला. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित डॉक्टरवर तातडीने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भाळवणी येथील डॉक्टर डॉ. मंगेश बेकारसे याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि भीमसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. कोट्यवधी जनतेचे आराध्य दैवत असलेल्या महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान केल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या.

​या विकृत कृत्याचा जाब विचारण्यासाठी आणि आपला निषेध नोंदवण्यासाठी आज (दि. २९) मोठ्या संख्येने भीमसैनिक भाळवणी येथे एकत्र आले. संतप्त कार्यकर्त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या डॉ. मंगेश बेकारसे याला गाठून थेट जाब विचारला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी संबंधित डॉक्टरच्या तोंडावर शाई फेकली आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याचा जाहीर निषेध करत चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. महापुरुषांची विटंबना करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी आग्रही मागणी आता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व नागरिकांमधून केली जात आहे.

हे सुद्धा वाचा :  मुख्यमंत्र्यांची विधानभवनात चक्क बुलेटवरून एन्ट्री, गडकरी बसने, तर प्रताप जाधव मेट्रोने प्रवास...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ