अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
दिल्ली जंतरमंतर येथे आंदोलनकर्त्या युवकांवर झालेल्या अमानुषपणे लाठीचार्ज घटनेचा व पोलिसांचा अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.कृष्णा झावरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वकिलांनी आपल्या काळ्या कोटावर लाल फिती लावून या घटनेचा जाहीर निषेधकरत न्यायालयीन कामकाज केले. न्यायालयाच्या पायऱ्यांवर सर्व वकील जमून घटनेच्या निषेधाच्या जोरदार घोषण देत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
अॅड.कृष्णा झावरे म्हणाले, दिल्लीयेथे जंतर मंतरवर देशातील युवक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. या आंदोलनकर्त्या युवकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने बघण्यापेक्षा त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा सर्व वकील निषेध करत आहेत. युवकांवर झालेला लाठीचार्ज हा अन्यायकारक असून याची साखोल चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली.
ज्येष्ठ विधीज्ञ सुरेश लगड म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विद्यार्थी सनदशीर मार्गाने जंतर मंतर येथे आंदोलन करत असताना पोलिसांनी केलेला लाठीचार्ज अत्यंत निंदनीय आहे. ही घटना लोकशाहीला काळिमा लावणारी आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ सर्व वकिलांनी आपल्या कोटला लाल फीत लावून निषेध नोंदवत न्यायालयीन कामकाज केले आहे.
यावेळी वसिम खान यांनीही निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात वकील संघटनेचे उपाध्यक्ष अमोल अकोलकर, विनोद शेटे, प्राजक्ता करांडे, माझी अध्यक्ष अनिल सरोदे, गौरव दांगट, जालिंदर कांबळे, अमृत पवार, अजय वचाटे, संकेत सुंबे, कादंबरी मोरे, महेश काळे, राजानंदीनी पुंडे, सुनील धाकणे, रोहित कळमकर, स्वप्नील बिहाणी, बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब भालसिंग, पिंटू पाटोळे, कश्यप तरकसे, सुरेश भोर, धनंजय वाघ, रणजित गोरे, संदीप साठे, सुभाष धामणे, महेश सुसे व युवराज पाटील आदी उपस्थित होते.










