मोरया इव्हेंट डेकोरेटरचा प्रामाणिकपणा
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
लग्न समारंभात हरवलेले सात तोळ्यांचे दागिणे परत करत मोरया इव्हेंट डेकोरेटरच्या प्रामाणिकपणाने सर्वांची मने जिंकली. ठुबे आणि शिंदे कुटुंबाकडून त्यांचा कपडे आणि रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
कान्हूरपठार (ता.पारनेर) येथील एलआयसी प्रतिनिधी सुरेश जयवंत ठुबे यांची मुलगी प्राजक्ता हिचा विवाह सोहळा शांताई मंगल कार्यालय, काष्टी याठिकाणी ऋषीकेश विठ्ठल शिंदे (रा.काष्टी) यांच्याबरोबर पार पडला. लग्नसमारंभाच्या धामधुमीत नवरदेवाच्या आईचे सात तोळ्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले. ही गोष्ट लग्नाला सहा दिवस झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यासंदर्भात विचारणा सुरू केली.या लग्नाचे काम देऊळगावचे रोहन गिरमकर यांच्या मोरया इव्हेंट यांना दिले होते. लग्न होऊन सहा दिवस गेल्यानंतर त्यांनी आपल्या कामगारांना विचारलं आणि त्या एका कामगारला ते सापडले असल्याचे सांगितले. एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना सुमारे अकरा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी ते शिंदे – ठुबे कुटूंबाकडे सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल ठुबे आणि शिंदे कुटुंबाकडून त्यांचा सत्कार केला.










