- जाहिरात -spot_img
breaking news

संभाजी महाराजांचे शौर्य, राष्ट्रप्रेम प्रेरणादायी ः महापौर गाडे

जयंतीनिमित्त मनपाकडून अभिवादन; बालकलाकारांच्या मर्दानी खेळांनी जल्लोषमय वातावरण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, उपयुक्त मेहेर लहारे, नगरसेवक निखिल वारे, अमोल गाडे, बाळासाहेब पवार, बाबुशेठ नागरगोजे, सुरेश बनसोडे, महेश तवले, करण कराळे, महेश लोंढे, दत्ता गाडळकर, पुष्कर कुलकर्णी, संपत नलवडे, ड. अनुराधा येवले, सविता जाधव, सचिन जगताप, बाळासाहेब निकम, ज्येष्ठ नेते श्रीराम येडे, मनोज ताठे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, सुरज शिंदे, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार, सिद्धीता दरेकर, सविता मोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या वतीने मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. बाल कलाकारांनी तलवारबाजी, दांडपट्टा आदींचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची आणि शौर्यगाथेची जिवंत झलक पाहायला मिळाली.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी संकटांचा सामना करत स्वराज्य टिकवण्यासाठी दिलेला लढा प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

आयुक्त यशवंत डांगे यांनीही मर्दानी खेळ सादर करणार्‍या बाल कलाकारांचे विशेष कौतुक केले. या लहान मुलांनी आपल्या कलेतून इतिहास जिवंत केला आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख होते, असे ते म्हणाले.
उपमहापौर ड. धनंजय जाधव यांनीही आपल्या भाषणातून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या विचारांचे स्मरण करून दिले.

प्रोफेसर कॉलनी चौकाचे नामकरण धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक करा
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उदात्त भावनेतून अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक प्रोफेसर कॉलनी परिसराचे अधिकृत नामकरण धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे करण्यात यावे, अशी भावनिक व आग्रही मागणी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील विशेष निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले. यावेळी ट्रस्ट कमिटी सदस्य संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, जिल्हाध्यक्ष अशोक गाडे, निलेश सुंबे, दरेकर काका, शशिकांत भांबरे, संजय शिंदे, भाग्येश सव्वाशे, सिद्धांत पानसरे, बालाजी काळे, भरत सुंबे, अभय शेडगे, श्रीपाद दगडे, सौरव गांगर्डे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  लग्नास नकार दिल्याने तरुणीचे मोडवले लग्न; पैशावरून राडा, कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशाची सुटका, कुठे काय घडलं

शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने प्रोफेसर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गटनेते दत्ता कावरे, विक्रम राठोड, नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे, नगरसेवक नवनाथ कातोरे, संदीप दातरंगे, परेश लोखंडे, माजी महापौर सुरेखा कदम, सुरेश तिवारी, दिपक आडेप, अभिजीत अष्टेकर, चेतन शिरसूल, प्रशांत कोकाटे, प्रताप गडाख, शाम सोनवणे, घनश्याम घोलप, स्वाती जाधव, शोभना चव्हाण, अरूण झेंडे, आबा महाराज गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ