- जाहिरात -spot_img
breaking news

धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी श्रीपाद छिंदम पोलिसांत, काय म्हटलंय निवेदनात..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महापालिका सभागृहात काही नगरसेकांनी धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.

शुक्रवारी दुपारी १ वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत श्रीपाद छिंदम उपस्थित होते. सभेदरम्यान त्यांनी आयुक्तांकडे अंदाजपत्रकासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. यानंतर काही नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. मयूर बांगरे यांनी त्यांना सभागृहात बोलण्याचा व बसण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. त्यानंतर गणेश भोसले, संपत बारस्कर, सुरेश बनसोडे आणि प्रकाश भागानगरे यांनी त्यांच्या टेबलवरील माईक तोडून महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले.तसेच अमोल येवले, विकी जगताप यांनी सभागृहात बसू देणार नाही अशी धमकी देत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

या घटनेमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छिंदम यांनी ही घटना पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. निवेदनात छिंदम यांनी संबंधित नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास संबंधितांनाच जबाबदार धरण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

छिंदमला काढले सभागृहाबाहेर
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पूर्वी, सन २०१८ मध्ये अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व विरोधी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी शुक्रवारी एकत्रितपणे महापालिका सभागृहातून बाहेर काढले. छिंदम शिवद्रोही असल्याने, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने त्याला सभागृहात बसण्याचा, बोलण्याचा अधिकार नाही, त्याला यापुढे सभागृहात प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा, अन्यथा आम्ही सभात्याग करू, असा इशारा देत छिंदम याला सदस्यांनी सभागृहातून बाहेर काढले.

हे सुद्धा वाचा :  व्यसन करायचेच असेल तर उज्ज्वल ध्येयाचे करा : खेडकर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ