- जाहिरात -spot_img
breaking news

शेतजमीन उकरण्याच्या कारणावरून राडा; हत्यारांसह दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला बेड्या

परस्परविरोधी फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
तालुक्यातील बाराबाभळी शिवारात शेतातील बांधाजवळ जमीन उकरण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन पुढे हाणामारीत झाले असून, दगडफेक केल्यामुळे एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्रल्हाद गुलाब कापसे (वय 45, रा. बाराबाभळी) हे आपल्या शेतात नातेवाईकांसह फुले तोडण्याचे काम करत होते. त्याच वेळी आरोपी दिपक लक्ष्मण कापसे, सुजल दिपक कापसे आणि सुनिता दिपक कापसे हे सर्वजण फिर्यादीच्या शेताच्या बांधाजवळ जेसीबीच्या साहाय्याने जमीन उकरण्याचे काम करत होते. बांधाजवळ जमीन उकरल्यामुळे आपल्याला शेतात येण्या-जाण्यासाठी रस्ता उरणार नाही, असे फिर्यादी प्रल्हाद कापसे यांनी आरोपींना सांगितले.

या गोष्टीचा राग मनात धरून तिन्ही आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. जमावातील एकाने दगड फेकून मारल्याने प्रल्हाद कापसे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रल्हाद कापसे यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी दिपक कापसे, सुजल कापसे आणि सुनिता कापसे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. आर. गारुडकर करत आहेत.

दुसरी फिर्याद दीपक लक्ष्मण कापसे (वय 44, रा. बाराबाभळी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रल्हाद गुलाब कापसे, सुजाता प्रल्हाद कापसे, ज्ञानेश्वरी प्रल्हाद कापसे आणि कृष्णा प्रल्हाद कापसे (सर्व रा. बाराबाभळी) यांच्याविरुद्ध मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी दीपक कापसे हे त्यांच्या मालकीच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने काम करत होते. त्यावेळी आरोपींनी तिथे येत काम तातडीने बंद करण्यास सांगितले. हे शेत माझे आहे, असे फिर्यादीने सांगताच आरोपींना मोठा राग आला. त्यांनी फिर्यादीला आणि साक्षीदारांना अलील शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गडबडीत आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात एका लोखंडी टनक वस्तूने जोरात प्रहार केला, ज्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पळून जाताना आरोपींनी ‌’जर पुन्हा आमच्या नादी लागलात, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही‌’, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी शेतकऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, सहाय्यक फौजदार दहिफळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या, कुठे घडला प्रकार पहा

हत्यारांसह दहशत निर्माण करणारा तरुण गजाआड
अहिल्यानगर : शहरातील गंजबाजार भागात धारदार चाकू आणि एअर पिस्टल बाळगून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. गंजबाजार परिसरात एक तरुण हातात हत्यारे घेऊन आरडाओरड करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक भीमराव गायकवाड (वय 23, रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई शनिवार, दिनांक 30 मे रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली.आरोपी गंजबाजार येथे हातात चाकू आणि एअर पिस्टल घेऊन फिरत होता. तो मोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे नागरिक घाबरले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडले. त्याच्याकडून धारदार लोखंडी चाकू आणि तीन हजार रुपये किमतीची एक लोखंडी एअर पिस्टल जप्त करण्यात आली आहे.

महागडे मोबाईल चोरीला
अहिल्यानगर : शहरातील नवनागापूर परिसरामध्ये असलेल्या दूध डेअरी चौक, दत्तमंदिर भागात घरफोडीची एक घटना समोर आली आहे. राहत्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने दोन महागडे मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी घनशाम नवनाथ मुंढे हा आपल्या मित्रासोबत या भागात राहतो. रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरात ठेवलेला फिर्यादीचा 30 हजार रुपये किमतीचा आणि त्याच्या मित्राचा 20 हजार रुपये किमतीचा असे एकूण 50 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घनशाम मुंढे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ