- जाहिरात -spot_img
breaking news

‌‘बॉबी‌’चा पुडा मागण्याच्या बहाण्याने आजीची चेन लांबविली

 

जामखेड | नगर सह्याद्री
शहरात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. खाडेनगर परिसरातील किराणा दुकानात बसलेल्या 90 वषय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्याने क्षणात लंपास केली. ‌‘बॉबी‌’चा पुडा घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या तरुणाने वृद्धेला गाफील ठेवत ही चोरी केली. गुरुवारी (दि. 2) दुपारी सुमारे 2 वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी हौसाबाई कुंतीलाल भंडारी (वय 90, रा. खाडेनगर, जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाडेनगर येथील नवकार किराणा दुकानात हौसाबाई भंडारी या नेहमीप्रमाणे बसल्या होत्या. त्यावेळी अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील एक अनोळखी तरुण दुकानात आला. त्याने बॉबीचा पुडा मागितला. वृद्ध महिला वस्तू देण्यासाठी पुढे वाकल्या असताना त्याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अत्यंत सफाईने हिसकावली.

त्यानंतर कोणालाही संशय येण्यापूवच तो तेथून पसार झाला.काही वेळानंतर हौसाबाई यांच्या गळ्यातील चेन नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र संशयिताचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, संशयित तरुणाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा :  बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी केली मोहीम फत्ते...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ