- जाहिरात -spot_img
breaking news

तीन महिन्यांत उभा राहणार डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा भव्य पुतळा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर | नगर सह्याद्री
श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल.हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता असून, येत्या ३ महिन्यांत बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करू, असा शब्द दिला. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयवादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतून समाचार घेतला.

यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णाकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा, अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणार्‍यांचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो. आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोद वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड, रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ. शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  अभिषेक कळमकर पुन्हा अडचणीत; भलताच कुटाना समोर, काय घडलं पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ