- जाहिरात -spot_img
breaking news

बिअर बार फोडणारी गँग जेरबंद; ५ गुन्हे उघड, ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, कुठे घडला प्रकार पहा

संगमनेर | नगर सह्याद्री –
संगमनेर परिसरातील बिअर बार आणि हॉटेल दुकाने फोडून विदेशी दारू व इतर साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ गुन्हे उघडकीस आणत तब्बल ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घारगाव पोलीस ठाण्यात १४२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी किशोर बाळाजी डोके यांच्या खंदरमाळवाडी येथील ‘हॉटेल निलायम बार’चे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ६ हजार १९० रुपयांची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही डीव्हीआर चोरी केला होता.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना हा गुन्हा नाशिकमधील रेकॉर्डवरील आरोपी हसन हमजा कुट्टी याने साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाशिक येथे छापा टाकून हसन हमजा कुट्टी, आकाश सचिन सूर्यवंशी आणि मेहताब गुलाम रसुल अन्सारी यांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी झारखंडमधील फरार साथीदार बंटी दास याच्यासह गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल पळसे (नाशिक) येथील ‘लकी बार अँड रेस्टॉरंट’चे चालक किरण उगले व विवेक उगले यांना विकल्याचेही समोर आले. तसेच चोरीसाठी वाहन उपलब्ध करून दिल्याची कबुलीही आरोपींनी दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ५ हजार १६० रुपयांची विदेशी दारू, १.५० लाख रुपयांची टाटा इंडिका कार (एमएच ४८ एफ ०७२३), कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल, स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासादरम्यान संगमनेर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील आणखी चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करत आहे.

हे सुद्धा वाचा :  पोलीस ठाण्यातच दोन गटात राडा, मावा कारखान्यावर छापा, आयटी कंपनीत चोरीचा प्रयत्न...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ