- जाहिरात -spot_img
breaking news

मुळा कारखाना निवडणूक ; 21 जागांसाठी एकूण 94 अर्ज दाखल, उमेदवार नसल्याने काही जागा बिनविरोध होणार

नेवासा | नगर सह्याद्री
तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत अखेरच्या दिवशी 21 संचालक पदांसाठी एकूण 94 अर्ज दाखल झाले आहे.

निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधी गटाने सुरुवातीपासून घेतली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी समोर आलेल्या आकडेवारीमुळे विरोधी गटाची ताकद अपेक्षेपेक्षा कमी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्ताधारी माजीमंत्री शंकरराव गडाख गटाकडून 81 अर्ज, तर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाकडून केवळ 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

काही मतदारसंघांमध्ये विरोधी गटाचा उमेदवारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सोसायटी मतदारसंघातून विरोधी गटाचा एकही अर्ज दाखल न झाल्याने माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर मागासवगय (ओबीसी), अनुसूचित जाती आणि घोडेगाव गटामध्येही विरोधी उमेदवार नसल्याने त्या जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त होत आहे. 3 जून रोजी अर्ज छाननी व माघारीच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी उमेदवार नसल्याने त्या जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त होत आहे

हे सुद्धा वाचा :  अभिषेक कळमकर पुन्हा अडचणीत; भलताच कुटाना समोर, काय घडलं पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ