- जाहिरात -spot_img
breaking news

केडगावमध्ये शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पतीला फोन केल्याने तरुणीसह कुटुंबाला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगाव येथील कोतकर मळा परिसरात सामाईक रस्त्याच्या कारणावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. जुन्या वादाची कुरापत काढून शेती व्यवसाय करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबावर शेजाऱ्यांनीच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्‌‍यात चाकू, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करण्यात आला असून, पीडित कुटुंबाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहादु किसन कोतकर (वय 60 वर्ष) हे आपल्या कुटुंबासह कोतकर मळा परिसरात राहतात. सामाईक रस्त्यावरून जात असताना आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर कोतकर, ऋतुजा ज्ञानेश्वर कोतकर, सुमन उर्फ बबई यादव कोतकर आणि ऋषीकेश यादव कोतकर यांनी त्यांना रस्त्यात अडवले. तुम्ही सर्वजण इथे कसे राहता तेच मी पाहतो, अशी धमकी देत आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी माऊली याने चाकू सारख्या धारदार शस्त्राने फिर्यादींवर वार केले. तर ऋषीकेश याने लाकडी दांडक्याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. इतर आरोपींनी दगडाने मारहाण करत लाथाबुक्क्‌‍यांनी गंभीर जखमा केल्या. या संपूर्ण झटापटीत पीडित कुटुंबातील सदस्यांचे दागिनेही गहाळ झाले आहेत.

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वास गाजरे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

पतीला फोन केल्याने तरुणीसह कुटुंबाला मारहाण
आयफोन हिसकावला; तीन जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पतीला फोन केल्याच्या कारणावरून वाद घालत एका तरुणीच्या घरात घुसून तिला, तिच्या आईला आणि बहिणीला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वडारवाडी, भिंगार येथे घडली असून याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकिता आशुतोष टाक, राखी रवींद्र बनसोडे आणि गणेश कुशाबा पाठक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठे खुलासे होणार; जिल्ह्यातील प्रत्येक वादात ‘तो’च लोकप्रतिनिधी का दिसतो?, सुजय विखे काय म्हणाले पहा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या कुटुंबासह वडारवाडी परिसरात राहते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिन्ही आरोपींनी संगनमत करून पीडित तरुणीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. घरात घुसताच आरोपींनी माझ्या पतीला पुन्हा फोन केला तर तुझ्याकडे पाहून घेईन अशी धमकी देत वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी पीडित तरुणी, तिची आई आणि तिची बहीण यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पीडित तरुणीच्या हातातील महागडा आयफोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ