- जाहिरात -spot_img
breaking news

सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी माझा लढा: माजी मंत्री शंकरराव गडाख

सोनईत शेतकरी मेळाव्यास हजारोंची उपस्थिती
सोनई | नगर सह्याद्री
गेल्या 5 वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी अनेक अडचणींना सामोरे जात आहे. मोठया कष्टानेे काटकसरीने कारभार करून मुळा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देता यावा, यासाठी इथेनॉल निमित प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प उभारला. मुळा सहकारी साखर कारखाना निवडणूक यशस्वी पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करत माझा लढा सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचा इशारा माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांना दिला.

सोनई येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना गडा, बोलत होते. याप्रसंगी मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, हभप रामनाथ महाराज पवार, हभप अवेराज महाराज, विश्वासराव गडाख, माजी सभापती सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, मुळाचे व्हा,चेअरमन कडूबाळ कर्डिले, दत्तात्रय काळे, तुकाराम शेंडे, बाजीराव मुंगसे, बाप्पूसाहेब शेटे, भाऊसाहेब मोटे, रामभाऊ जगताप, कारभारी जावळे, अजित मुरकुटे, कैलास झगरे, प्रभाकर कोलते, काकासाहेब शिंदे, नानाभाऊ नवथर, श्रीरंग हारदे, अशोक हारदे, नानासाहेब रेपाळे, भाऊसाहेब लांडे, ॲड. आण्णासाहेब अंबाडे, अभिजित लुनिया, आण्णासाहेब पटारे, संजय सुखधान, कृष्णा शिंदे,, मुक्तार शेख, कानिफनाथ येळवंडे, प्रा.गणपत चव्हाण, आबासाहेब फाटके आदी उपस्थित होते..

मा.मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, मा.खा.यशवंतराव गडाख यांनी उभी केलेली कामधेनू आपल्या सर्वांच्या साथीने समर्थपणे चालवत असल्याचा अभिमान आहे. नेवासा तालुक्यातील गावागावात मुळा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस बेणे, खते, पाईपलाईनसाठी ॲडव्हान्स, बंधारे निर्मिती, ट्रॅक्टर खरेदी, ऊस हार्वेस्टिंग मशीन यासाठी मदत करून शेतकऱ्यांना शेती उभे करण्यासाठी मदत केली. यामुळे निश्चितच तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. तालुक्याचा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जनसेवेची वाटचाल सदैव ठेवणार आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ लाभत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी ॲड सुभाष दरंदले, अश्रूबा सानप, योगेश होंडे, बाळासाहेब पाटील,नवनाथ पठाडे, बाबा घुले, मुकुंद भोगे,अरुण घावटे, जालिंदर येळवंडे, राजेंद्र टेमक आदींनी मनोगत व्यक्त केले. गडाख यांच्यासोबत राहून व जनतेच्या कामाशी बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले. डॉ रामनाथ बडे यांनी सूत्रसंचालन केले. नेवासा तालुक्यातील शेतकरी, विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद तसेच जेष्ठांसह तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉ. रामनाथ बडे यांनी सूत्रसंचालन केले.

हे सुद्धा वाचा :  शिरूर पोलीस निरीक्षकांसमोर गुन्हेगारी, ड्रग्ज व वाहतूक शिस्तीचे आव्हान.....

आगामी कारखाना निवडणूक लढणार नाही
फक्त विरोधाला विरोध करून चांगल्या चाललेल्या संस्थेत विरोधकांनी राजकारण आणू नये. सहकारी साखर कारखानदारी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. मा. खा. यशवंतराव गडाख व माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंंबातील व्यक्तीला सलग 11 वर्षे मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहण्याची संधी दिली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कारखाना निवडणूक न लढविण्याचे मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी जाहीर केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ