- जाहिरात -spot_img
breaking news

शेजारील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल…

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

मुंबई/नगर सह्याद्री :
पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७०-७५ डॉलरवरून थेट १०० डॉलरच्या पार गेले आहेत. या जागतिक संकटाचा सर्वाधिक फटका भारताच्या शेजारील देशांना बसला असून, तिथे पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

भारताची स्थिती मात्र स्थिर आणि नियंत्रणात आहे. १५ मे रोजी भारतात पेट्रोलमध्ये केवळ ३.१४ रुपये (३.४%) आणि डिझेलमध्ये ३.११ रुपये (३.६%) इतकीच किरकोळ वाढ झाली आहे.

पाकिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. गेल्या ३ महिन्यांत तिथे पेट्रोल ६४% आणि डिझेल ६१% महागले आहे. तिथे सध्या पेट्रोल ४५८.८६ पाकिस्तानी रुपये आणि डिझेल ५२०.४२ पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

नेपाळ हा सध्या दक्षिण आशियामध्ये सर्वात महाग पेट्रोल विकणारा देश बनला आहे. पूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेल्या नेपाळमध्ये एप्रिल २०२६ मध्ये एकाच महिन्यात तब्बल ४ वेळा दरवाढ करण्यात आली. जानेवारीत १३७ नेपाळी रुपये असलेले पेट्रोल आता २१९ नेपाळी रुपयांवर (भारतीय चलनानुसार ₹१२३.५८) गेले. तेथील अन्नधान्य आणि रोजच्या वस्तूंचे भाव कडाडले आहेत.

मार्च २०२६ मध्ये श्रीलंकेत आशियातील सर्वात मोठी इंधन दरवाढ झाली. तिथे ऑटो डिझेल २६.१ टक्क्यांनी वाढून ३८२ रुपयांवर गेले आहे. श्रीलंकेत सध्या पेट्रोल ३९८ श्रीलंकाई रुपये (भारतीय चलनानुसार ₹१०८.५५) प्रति लिटर झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारने इंधनाचे ‘रेशनिंग’, म्हणजेच कोणालाही गरजेपेक्षा जास्त तेल दिले जात नाहीये.

आपल्या गरजेच्या ९५% तेल आयात करणाऱ्या बांगलादेश सरकारला अखेर सबसिडीचा भार न पेलवल्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये १० ते १६ टक्क्यांनी दर वाढवावे लागले. सध्या तिथल्या अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंप कोरडे पडले असून, तेलासाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा :  युद्धाचा भडका; भारतात हाय अलर्ट, आज काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ