- जाहिरात -spot_img
breaking news

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार, तेल कंपनीच्या ‘त्या’ निर्णयानं खळबळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
देशात एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅसच्या किंमत ११५ रुपयांनी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम थेट गॅसच्या किंमतीवर होताना दिसत आहे.

युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलवर ?
इराण-इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. त्यामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.त्यामुळे इंधन,गॅसची आयात होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता तेल कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल, असं तेल कंपन्यांनी सांगितले आहे.

तेल कंपन्यांचा निर्णय
पुण्यातील पेट्रोल डिझेल डीलरला तेल कंपनीचे मेसेज आले आहेत. कालपासून पुण्यातील अनेक डीलरला पेट्रोल कंपन्यांचे मेसेज आले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो. युद्ध पेटल्यामुळे येणाऱ्या तेलावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज पेट्रोल डिझेल हवं असेल तर ॲडव्हान्स पैसे भरा असं डीलर ला त्या त्या कंपनीने मेसेज करून सांगितले आहे.

अगोदर आठ-आठ दिवसाचं क्रेडिट पेट्रोल डीलरला मिळत होते मात्र आत्ता असं मिळणार नाही असं कंपन्यांकडून सांगण्यात आला आहे. हा सगळा युद्धाचा परिणाम आहे असं सांगण्यात येतंय त्यामुळे युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलवरही होणार असल्याचे दिसत आहे.

वाहनांमधील एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या
नागपूरमधील ‘गो गॅस’ पंपावर LPG चा पुरवठा मर्यादित होत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहनात लागणाऱ्या LPG किंमतीत वाढ झाली आहे. LPG च्या किमतीत दुसऱ्या दिवशी 5 रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिका इराण युद्धाचा फटका LPG आयातीला बसत आहे त्यामुळे दरवाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. काल 64.98 पैसे प्रति किलो दर होता, आज त्यात 5 रुपयांची वाढ होऊन 69.93 रुपये झाला आहे. ऑटो LPG च्या किमतीत दोन दिवसांत 13 रुपयांची वाढ झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट!; बंगालमध्ये भाजपचे ‘कमळ’ फुलले! सुनेत्रा पवार यांनी रेकॉर्ड मोडला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ