- जाहिरात -spot_img
breaking news

पाकिस्तान ख्रिस्ती समुदायावर सततचा धोका

11 एप्रिल 2026 रोजी, पंजाब प्रांतातील ननकाना साहिब जिल्ह्यातील शाहकोट येथील 25 वर्षीय ख्रिस्ती महिलेवर स्थानिक कंत्राटदार फैजान मेहबूब रहमानी आणि त्याच्या साथीदाराने तिच्या गावात कथितपणे बलात्कार केला. 5 एप्रिल 2026 रोजी, पंजाबमधील गुजरांवाला जिल्ह्यात सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी कॅथोलिक चर्चच्या 200 हून अधिक सदस्यांच्या ईस्टर सूर्योदय मिरवणुकीदरम्यान, एका चालकाने वेगाने ट्रक श्रद्धाळूच्या गर्दीत घुसवला, ज्यामुळे 60 जण जखमी झाले. 4 मार्च 2026 रोजी, पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यात 21 वर्षीय ख्रिस्ती शेतमजूर मार्कस मसीह याची त्याच्या मुस्लिम नियोक्त्यांनी, मोहम्मद मोहसिन खराल आणि मोहम्मद बशारत खराल यांनी हत्या केली.

26 मार्च 2026 रोजी, पोलिसांनी लाहोरमधील सधोकी काहना नौ भागात ख्रिस्ती व्यक्ती इफ्तिखार मसीह यांच्या मृत्यूला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले की त्यांचे शरीर छताच्या पंख्याला स्कार्फने लटकलेल्या अवस्थेत आढळले. 27 मार्च 2026 रोजी, फैसलाबाद विभागातील जरनवाला येथील चक नं. 648-जीबी गावातील अफजल जावेद मसीह यांनी सांगितले की, त्यांच्या 15 वर्षीय मुलगी सिदरा बीबी हिला पहाटेच्या सुमारास अली मुर्तजा नावाच्या मुस्लिम व्यक्तीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्या घरातून अपहरण केले.

2025 मधील परिस्थितीच्या आधारे, 4 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक अहवालात युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) ने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला पाकिस्तानसह 12 इतर देशांना ‘कंट्रीज ऑफ पार्टिक्युलर कन्सर्न (Countries of Particular Concern) म्हणून पुन्हा नामांकित करण्याची शिफारस केली. तसेच, धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनांसाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानी अधिकारी आणि संस्थांवर लक्षित निर्बंध (मालमत्ता गोठवणे आणि व्हिसा निर्बंध) लावण्याची मागणी केली.
पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या केवळ 1.3 टक्के आहे आणि ते बहुतेक वेळा सर्वात गरीब आणि दुर्लक्षित नागरिकांमध्ये गणले जातात.

ओपन डोर्सच्या “वर्ल्ड वॉच लिस्ट 2026″ नुसार, ख्रिस्त्यांवर सर्वाधिक अत्याचार होणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान क्रमांकावर आहे. उत्तर कोरिया, सोमालिया, सीरिया, येमेन, सुदान, इरिट्रिया आणि नायजेरिया हे देश त्यापेक्षा वर आहेत. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना दैनंदिन भेदभावापासून ते जीवघेण्या हिंसेपर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. देशातील कुप्रसिद्ध धर्मनिंदा कायद्यांचा वापर ख्रिस्ती आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांना घाबरवण्यासाठी वाढत्या प्रमाणात केला जात आहे. बहुतेक ख्रिस्ती पंजाब प्रांतात राहतात, जिथे अत्याचाराच्या घटना सर्वाधिक आहेत, तर सिंध प्रांत बंधुआ मजुरीसाठी कुप्रसिद्ध आहे, ज्याचा परिणाम अनेक ख्रिसमांवर होतो. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये ख्रिस्त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा एकाकीपणा त्यांना हिंसेसाठी अधिक असुरक्षित बनवतो.

हे सुद्धा वाचा :  पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा! तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

पाकिस्तानमधील धर्मनिंदा कायद्यांचा वाढत्या प्रमाणात गैरवापर होत असून, यात व्यावसायिक स्पर्धा, वैयक्तिक किंवा धार्मिक वाद, धार्मिक अल्पसंख्यांकांविषयी शत्रुता आणि आर्थिक फायद्याचे गणित (जमीन आणि मालमत्ता हस्तगत करणे) यांचा समावेश आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीतील मोठी त्रुटी म्हणजे केवळ तक्रारदाराच्या साक्षीवरच आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले जाते. ख्रिस्ती विशेषतः धोक्यात आहेत, कारण लाहोर, गोजरा, जरनवाला आणि इस्लामाबादसारख्या शहरांमध्ये धर्मनिंदेच्या आरोपांनंतर त्यांच्या वस्त्यांवर हल्ले आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 1987 ते 2024 दरम्यान किमान 307 ख्रिसमांवर धर्मनिंदेचे आरोप झाले, तर 1994 ते 2024 दरम्यान 26 ख्रिस्त्यांची न्यायबाह्य हत्या झाली. ख्रिस्ती समुदाय जमीन बळकावण्याचाही बळी ठरतो. अनेक वेळा मालमत्ता जप्त करणे हे धर्मनिंदा-संबंधित हिंसेशी जोडलेले असते, जिथे ख्रिसमांच्या घरांवर आणि उपासनेच्या ठिकाणांवर हल्ले होतात आणि ‘आरोपींना’ आपली घरे सोडून पळून जावे लागते. उदाहरणार्थ, 2 मार्च 2026 रोजी सरवर मसीह आणि त्यांच्या कुटुंबाला शेजाऱ्यांनी केलेल्या धर्मनिंदेच्या आरोपांमुळे आपली मालमत्ता सोडावी लागली. ह्यूमन राइट्स वॉचच्या 9 जून 2025 रोजी प्रकाशित “ए कॉन्स्पिरसी टू ग्रॅब द लँड” या अहवालात अशा अनेक घटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजी फैसलाबाद जिल्ह्यात शेकडो लोकांनी एका ख्रिस्ती वस्तीवर हल्ला केला, तर मार्च 2013 मध्ये लाहोरमधील जोसेफ कॉलनीवर 3,000 लोकांच्या जमावाने हल्ला करून 100 हून अधिक घरे जाळली आणि लुटली.

ख्रिस्ती मुली जबरदस्तीच्या विवाह आणि धर्मांतराच्या बळी ठरतात, जे अनेकदा अपहरणानंतर घडते. सेंटर फॉर सोशल जस्टिसच्या माहितीनुसार, जानेवारी 2021 ते डिसेंबर 2024 दरम्यान किमान 137 ख्रिस्ती मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह लावण्यात आले, ज्यांचे वय साधारणपणे 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान होते. 22 एप्रिल 2026 रोजी असेही समोर आले की, 13 वर्षीय मारिया शाहबाज प्रकरणात न्यायालयाने तिचा 30 वर्षीय मुस्लिम व्यक्तीसोबतचा विवाह वैध ठरवला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मारियाच्या वडिलांनी दावा केला होता की जुलै 2025 मध्ये तिचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. या निर्णयावर मानवाधिकार संघटना, चर्च नेते आणि राजकीय व्यक्तींनी तीव्र टीका केली असून, हा निर्णय धोकादायक उदाहरण ठरू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. 2026 च्या ग्लोबल जेंडर गैप अहवालानुसार, पाकिस्तान 156 देशांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा :  शरणागती पत्करा, अन्यथा…”; ट्रम्प यांच्या ‘अश्मयुग’ धमकीला इराणचे जशास तसे उत्तर!

पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती समाजाला सामाजिक भेदभाव आणि अस्पृतेलाही सामोरे जावे लागते, जिथे त्यांना ‘इसाई चूहडा’ आणि ‘चमार सारख्या अपमानास्पद नावांनी संबोधले जाते. ‘शुद्धता आणि अशुद्धता या प्रथा अन्न-पाणी, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या क्षेत्रांमध्येही लादल्या जातात. पाकिस्तानमधील खिल्यांवरील अत्याचार खोलवर रुजलेला आहे, जो धर्मनिंदा कायद्यांच्या गैरवापर, सामाजिक असहिष्णुता आणि वारंवार होणाऱ्या जमाव हिंसेमुळे टिकून आहे. राज्याची प्रतिक्रिया बहुतांश वेळा उशिरा आणि अपुरी ठरली असून दोषींवर कारवाई कमी प्रमाणात झाल्याचे दिसते.

संचिता भट्टाचार्य
रिसर्च फेलो इन्टिट्यूट फॉर काँफ्लिट मॅनेजमेंट

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ