- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक, जिल्हाधिकाऱयांचा मोठा निर्णय, सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया
खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश
उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात राहूरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी शैलेश मोरे व विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेली सर्व भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके व नियंत्रण कक्षांनी कार्यान्वित करण्यात आले असून या सर्व पथकांनी दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

खर्च निरीक्षक व्ही. कुमार म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार नियमित निवडणूक व पोटनिवडणूक यात कोणताही भेद नसून सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. बँकांमधील संशयास्पद व्यवहारांची माहिती थेट प्राप्तिकर विभागाला कळवावी. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने अवैध मद्य व पैशांच्या वाहतुकीवर कारवाई करावी. स्थिर सर्वेक्षण पथकांनी तपासणी नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवावा. तसेच सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी व त्यांच्या जागा अद्ययावत कराव्यात.

व्हिडिओ सर्वेक्षण पथकाने राजकीय सभांचे चित्रीकरण करताना मंचाचा आकार, खुर्च्यांची संख्या व इतर व्यवस्थेची सविस्तर नोंद घ्यावी जेणेकरून खर्चाचा अचूक अंदाज बांधता येईल. समाजमाध्यमांवरील प्रचारावरदेखील विशेष लक्ष ठेवावे व उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपये असल्याने खर्चाच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास ती वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हे सुद्धा वाचा :  ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ. जगताप आक्रमक, महिलांनी षडयंत्र समजून घ्या, वेळीच सावध व्हा, अन्यथा...

सी-व्हिजिल प्रणालीवर येणाऱ्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे, असे स्पष्ट करत सर्व पथकांनी समन्वयाने काम करून पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ