- जाहिरात -spot_img
breaking news

निवडणुकांच्या तोंडावर पारनेर बाजार समितीमध्ये खांदेपालट, सभापतीपदाच्या माळ पडली ‘या’ नेत्याच्या गळ्यात

बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर / उपसभापतिपदी संदीप सालके यांची बिनविरोध निवड | आगामी निवडणुकांच्या तोंडावर बाजार समितीमध्ये मोठी खांदेपालट

पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा पेच अखेर सुटला असून, सभापतीपदी अनुभवी नेते गंगाराम बेलकर तर उपसभापतीपदी खासदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे युवा शिलेदार संदीप सालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या परिसरात फटायांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

किसनराव रासकर यांनी सभापतीपदाचा आणि किसनराव सुपेकर यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही रिक्त झालेली पदे भरण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जाधव यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर खासदार लंके यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंगाराम बेलकर यांना बाजार समितीच्या शिरपेचात मानाचा  तुरा रोवण्याची संधी मिळाली आहे. बेलकर हे तालुयाचे ज्येष्ठ नेते असून त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे, तसेच त्यांच्या पत्नी अरुणा बेलकर यांनीही पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.

दुसरीकडे, उपसभापतीपदी वर्णी लागलेले संदीप सालके हे निलेश लंके प्रतिष्ठानचे अतिशय जुने आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एका निष्ठावान युवा कार्यकर्त्याला संधी देऊन खा. लंके यांनी तरुणांवर मोठा विश्वास टाकला आहे.या निवडीपूर्वी खा. लंके यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांनी बेलकर आणि सालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानुसार ही निवड बिनविरोध झाली. साधारण तीन वर्षांपूर्वी खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीवर सत्तांतर झाले होते. सत्तेच्या सुरुवातीला बाबासाहेब तरटे आणि बापू शिर्के यांना संधी मिळाली होती, त्यानंतर किसन रासकर आणि किसन सुपेकर यांनी कार्यभार सांभाळला. आता तिसर्‍या टप्प्यात बेलकर आणि सालके यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात संभाजी ब्रिगेडचा एल्गार...

निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या परिसरात फटायांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी माजी सभापती बाबासाहेब तरटे, माजी सभापती सुदाम पवार किसनराव रासकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगीराज गाडे, रा. या. औटी, अशोक कटारिया, पद्मजा पठारे, छाया रोकडे, बाबासाहेब नर्हे, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के, चंदन भळगट, अशोक कटारिया, विजय पवार, आबासाहेब खोडदे, सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, जितेश सरडे, सचिन पठारे, रवींद्र राजदेव, शहराध्यक्ष संदीप मते, रायभान औटी, शिवाजी बेलकर, उद्योजक संतोष गायखे, बाळासाहेब खिलारी, श्रीरंग रोकडे, रवींद्र गायखे, तुकाराम चव्हाण, संदीप चौधरी, भूषण शेलार, बाळासाहेब दिघे, पंकज बेलकर, चैतन्य बेलकर, अ‍ॅड. गणेश कावरे, लखन ठाणगे, गणेश गायखे, रामदास साळवे, प्रमोद गुगळे, शिवाजी भोसले, बाळासाहेब दाते, शांताराम बेलकर, अरुण बेलकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

राजकीय दृष्टिकोनातून निवडीचे महत्त्व
येणार्‍या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेलकर आणि सालके यांची निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पदाधिकारी खासदारांची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देणार
खासदार निलेश लंके यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, तो आम्ही सार्थ ठरवू. बाजार समितीच्या सर्व संचालकांना सोबत घेऊन भविष्यात शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सभापती गंगाराम बेलकर व उपसभापती संदीप सालके यांनी दिली.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ