- जाहिरात -spot_img
breaking news

कार्तिक करांडे राज्य क्रिकेट संघात..कशी झाली निवड

हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचा प्रतिभावान क्रिकेटपटू कार्तिक वैभव करांडे याची डेीसीसीआय (डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया) आयोजित पाचव्या एलिट फिजिकल डिसेब्लिटी टी-20 चॅम्पियनशीप 2026 साठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. कार्तिकच्या या निवडीमुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बंगळुरू येथे 17 मे ते 27 मे या कालावधीत होत असलेल्या डीसीसीआयच्या खुल्या वयोगटातील मुलांच्या प्रतिष्ठेच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत कार्तिक महाराष्ट्र राज्य डिसेब्लिटी क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील गुणवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा दर्जेदार स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवणे हे कार्तिकच्या मेहनतीचे व गुणवत्तेचे मोठे यश आहे.

कार्तिक हा उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज व डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. यापूवही त्याने 14 व 16 वर्षांखालील मुलांच्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विजय क्लब, पुणे संघाचे प्रतिनिधित्व करून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि खेळावरील निष्ठा यामुळे त्याने प्रगती साधली आहे. तो सध्या अहिल्यानगर येथील हुंडेकरी स्पोर्ट्‌‍स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सरफराज बांगडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कार्तिकच्या या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी यांच्यासह क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा :  एलपीजी ‘गो गॅस’ दरवाढीविरोधात रिक्षा चालकांचा एल्गार; काय आहेत मागण्या, पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ