वाहनांच्या लांबलचक रांगा
निघोज | नगर सह्याद्री
कुकडी डावा कालव्याला मंगळवारी (दि.३) मध्यरात्री पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे, माजी सरपंच ठकारामलंके, सभापती किसनराव रासकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
कुकडी डावा कालव्याला मंगळवार दि.३ मार्च रोजी पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी निघोज एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ ते जवळपास ११ वाजेपर्यंत दोन तास आंदोलन सुरू होते. पोलीस प्रशासन तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ, भास्करराव शिरोळे, माजी सरपंच ठकाराम लंके, बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी उपस्थित शेतकर्यांबरोबर चर्चा केली. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तान्हाजी खाडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधावा व आजच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी खाडे यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. मंगळवार दि.३ रोजी मध्यरात्री दरम्यान पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्शसानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव ढवण, ज्येष्ठ नेते अनंतराव वरखडे, शिंदे शिवसेनेचे शेतकरी विभागाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पांढरकर, जालिंदर उर्फ बाळासाहेब लंके, पवन महाराज तनपुरे, ग्रामपंचात सदस्य शंकरराव गुंड, नारायण घोगरे, शंकर वरखडे, दिगंबर लाळगे, सोसायटी चेअरमन सुनील वराळ, व्हाईस चेअरमन संतोष लामखडे, शांताराम लाळगे, हरिभाऊ पठारे, श्रीकांत लामखडे, संचालक दिलीप कवाद, शांताराम कवाद, अनिल लमखडे,्र विश्वास शेटे, दिलीप लाळगे, सुभाष वराळ. चंद्रकांत लंके, पांडुरंग पाटील लंके, बाळासाहेब लामखडे, शिवाजीराव डेरे, जालिंदर लंके , मंगेश लंके, राहुल लमखडे, गोविंद लामखडे, तानाजी लामखडे, विनायक सोनवणे, संतोष लाळगे, गणेश लंके, कैलास लाळगे, ज्ञानेश्वर काळे आदी तसेच परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. भास्कर शिरोळे यांनी सांगितले की, आपण जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. मात्र, ज्यांनी आजपर्यंत शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका अद्याप घेतली नाही, पाणी असूनही पाणी सोडत नाही. शेतीमालाला कधी भाव दिला नाही ते सरकार व त्यांच्या नेत्यांनी पाणी सोडण्यासाठी राजकारण केले आहे.
पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी तालुयातील जनतेला मिळावे, यासाठी सातत्याने लढा दिला आहे. आजचे सत्ताधारी मात्र लोकहिताचे निर्णय न घेता शेतकरी व सर्वसामान्य जनतेची नुकसान कसे होईल, याबाजूने प्रयत्न करीत आहेत. माजी सरपंच ठकाराम लंके व बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी शिरुर व पारनेर रस्त्यावर शेकडो गाड्या अडकल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक कोळपे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.










