- जाहिरात -spot_img
breaking news

हॉटेलिंग क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संदीप ग्लोबल वेंचर्सच्या ‘हॉटेल सचिन’चा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

स्वादप्रेमी नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

हॉटेलिंग क्षेत्रामध्ये फेब्रुवारी १९८७ पासून विशेष नवलौकिक असलेल्या संदीप ग्लोबल वेंचर्सच्या चास येथील नवीन सुसज्ज इमारत असलेल्या हॉटेल सचिनचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच्या वर १९ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होत असल्याची माहिती संचालक सचिन भानुदास कोतकर यांनी दिली.

नगर – पुणे रोडवर केडगाव येथे हॉटेल संदीपच्या माध्यमातून फेब्रुवारी १९८७ मध्ये ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी हॉटेलिंग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यास अभूतपूर्व अशा प्रतिसादानंतर फेब्रुवारी १९९९ मध्ये नगर पुणे रोडवर केडगाव परिसरात हॉटेल न्यू सचिन प्युअर व्हेज, जून २०१० मध्ये नगर शहरातील सक्कर चौक येथील हॉटेल उदयनराजे पॅलेस, सप्टेंबर २०२० मध्ये हॉटेल संदीप शिवाजीनगर, डिसेंबर २०२२ मध्ये पुणे येथील हॉटेल संदीप मगरपट्टा व हॉटेल संदीप चंदन नगर, मार्च २०२४ मध्ये हॉटेल संदीप पुनावळे आणि आता अहिल्यानगरमध्ये नगर – पुणे रोडवर चास येथे भव्य व सुसज्ज अशा इमारतीमध्ये हॉटेल सचिनचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होत आहे.

संदीप ग्लोबल वेंचर्सने हॉटेलिंग, हॉस्पिटॅलिटी व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रचर, एव्हिएशन, एग्रीकल्चर या क्षेत्रातही दमदार पदार्पण केले आहे.या शुभारंभ प्रसंगी सर्व स्वादप्रेमींनी उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण सौ. सुरेखा भानुदास कोतकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे व नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर, माजी महापौर संदीप भानुदास कोतकर, उद्योजक सचिन भानुदास कोतकर व उद्योजक अमोल भानुदास कोतकर यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :  चिमुकल्याला कडेला घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी हटविली अतिक्रमणे ...अहिल्यानगरमधील घटना
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ