- जाहिरात -spot_img
breaking news

श्रीगोंदा शहर कडकडीत बंद; काय घडला प्रकार पहा..

व्यावसायिक महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला, आरोपींना अटक करण्याची मागणी
श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले उद्यानासमोर एका महिला व्यावसायिकेवर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात संबंधित महिला जखमी झाली असून, तिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेच्या निषेधाथ श्रीगोंदा शहर मंगळवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले. पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा नेण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी संतप्त आंदोलकांनी केली.

महिला व्यावसायिकेवर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याच्या निषेधार्थ संत शेख महंमद बाबा दर्गा येथे व्यापारी, गावकरी व विविध पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक पार पडली. बैठकीत आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. संत शेख महंमद महाराज मंदिरापासून पोलीस स्टेशनकडे मोर्चा नेण्यात आला.

पोलीस स्टेशनमध्य या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यासंबंधी वेगवेगळ्या घटनांविषयी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करण्यात केला.आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली आली. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील बहुतांश दुकाने, आस्थापने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा :  सात दिवसांत 336 वाहनांवर कारवाई, सहा लाख दंड वसूल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ