- जाहिरात -spot_img
breaking news

हॉस्पिटलला पार्किंग सुविधा नसल्याने शिवसेना आक्रमक; काय दिला इशारा पहा…

शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार ः संभाजी कदम
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरासह सावेडी उपनगरातील हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. परंतु हॉस्पिटलमध्ये गरजेच्या मानाने अत्यंत अपुरी पार्किंग व्यवस्था उपलब्ध असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटल परिसरातील पे अँड पार्क सुविधा तत्काळ बंद करा किंवा हॉस्पिटल प्रशासनास पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत निर्देश देऊन आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अन्यथ शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

शिवसेनेच्यावतीने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, दत्तात्रय कावरे, कुणाल खेरे, परेश लोखंडे अभिजित अष्टेकर, प्रा. विशाल शितोळे, तृप्ती साळवे, संग्राम कोतकर, अरुण झेंडे, संजय शेंडगे , चंद्रकांत शेळके, विनय वाखुरे, प्रताप गडाख,संदीप दातरंगे, सलोनी शिंदे,नलिनी गायकवाड आदी उपस्थित होते.

हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रुग्ण व नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क करावी लागत आहेत. अशातच महानगरपालिकेमार्फत त्या परिसरात पे अँड पार्क सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात रुग्णालयाने स्वतः पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. जर हॉस्पिटलकडे आवश्यक पार्किंग सुविधा उपलब्ध नसेल, तर महानगरपालिकेने संबंधित हॉस्पिटल प्रशासनावर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु त्याऐवजी आधीच आरोग्य व आर्थिक समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्ण व नातेवाईकांकडून पे अँड पार्कच्या माध्यमातून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. ही बाब नागरिकांच्या दृष्टीने अन्यायकारक असून त्यातून आर्थिक शोषण होत आहे.ही बाब गांभीर्याने घेऊन हॉस्पिटल प्रशासनास पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ