- जाहिरात -spot_img

नगरमध्ये तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; काय घडलं पहा

दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून भेसळीवरील कारवाईचे स्वागत
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बेधडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील दूध उत्पादक शेतकरी यांनी तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

राज्यात सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध बाजारातून कमी होण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुद्ध दुधाला अधिक मागणी निर्माण होऊन दुधाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध विभागातून बदली करू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.

आंदोलनामध्ये खडकी सेवा संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव भोसले, सरपंच भाऊसाहेब बहिरट, नंदू रोकडे, राहुल बहिरट, सुनील कोठुळे, दीपक वाबळे, राहुल आबासाहेब कोठुळे, अरुण कोठुळे, हेमंत कोठुळे, अंबादास रोकडे, नवनाथ रोकडे, संतोष बहिरट, राहुल रोकडे, अशोक रोकडे, दीपक कोठुळे, गोरख कोठुळे, सतीश साळुंखे, बाळासाहेब कोठुळे, बाळू बळवंत कोठुळे, चेअरमन संदीप चोभे, कैलास कोठुळे, नवनाथ कोठुळे, अशोक कोठुळे, अनिल कोठुळे, प्रकाश साळुंखे, अमृता कोठुळे, आबासाहेब कोठुळे, मिनिनाथ बेरड, राहुल निकम, अविनाश रोकडे, संदीप कोठुळे, शेखर कोठुळे, भरत तांबे, ऋषिकेश निकम, मेघराज कोठुळे, भाऊसाहेब गायकवाड, बापू कोठुळे, नाथासाहेब कोठुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

हे सुद्धा वाचा :  आराध्य गीतातून श्रीगोंदा पोलिसांच्या कामकाजावर नाराजी...कशामुळे व्यक्त केला रोष
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com