- जाहिरात -spot_img
breaking news

सापाला चेचला पाहिजे…; अशोक खरातला मारुन…, भिडे गुरुजी काय म्हणाले पहा

पुणे | नगर सह्याद्री –
राज्यभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. भोंदूबाबा खरातने अनेक पिडीत महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याची, त्याचबरोबर अनेकांना धमकावून जमीनी, मालमत्ता घेतल्या असल्याचे, त्याचबरोबर फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील या भोंदूबाबा आणि स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याची काळी कृत्ये उघडकीस आल्यानंतर आणि त्याला राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांकडून सहकार्याचा हात असल्याचे समोर येत असून त्यांच्या सोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणावर आता भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक खरातला मारुन टाकून विषय संपवावा
‘अशोक खरातला मारून टाकून विषय संपवावा, अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी दिले. ते पुण्यात बोलत होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुण्यात श्रीराम नवमीनिमित्त हजेरी लावली. त्यांनी राज्यातील लव्ह जिहाद आणि भोंदू अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले. संभाजी भिडे म्हणाले, ‘आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस आपण रामनवमी मानला पाहिजे. यावेळी त्यांनी राम स्तोत्र म्हटले. हे सगळे ठीक आहे. राम तत्वाला हरताळ फासणाऱ्या लोकांचा निर्णय बंदोबस्त करण्याची प्रकृती माणसात आणि समाजात असली पाहिजे.

सापाला सोडता कामा नये, सापाला चेचला पाहिजे
‘प्राणीमात्रात राम आहे. असा सिद्धांत मांडून सापाला सोडता कामा नये. सापाला चेचला पाहिजे. राम प्रत्येक प्राण्यात असला पाहिजे. हा हिशोब हिंदुस्तान चुकला तर हिंदुस्तानी स्वातंत्र्य गमावलं ते गमू नये, असं वाटत असेल तर. कडव्या वृत्तीचा हिंदू समाज होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

भिडे यांनी यावेळी लव्ह जिहादवरही भाष्य केले. ‘लव्ह जिहाद कशा पद्धतीने रोखले गेले पाहिजेत. या सगळ्याच काळात घडणार आहे’. तर भोंदू खरातवर भिडे यांनी भाष्य केलं. भिडे गुरुजी म्हणाले, ‘रामाचा आदर्श ठेवून रोखलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण जसे महत्वाचे आहे. तसे छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे… राम आणि कृष्ण दोन्ही देव महत्वाचे आहे. ते भगवान असले तरी शिवाजी महाराज सर्वात प्रभावी अत्यावश्यक आहेत’.

हे सुद्धा वाचा :  पुण्यात थरकाप! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात भयानक कृत्य

खरातच्या चौकशीत अनेक खुलासे
बड्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर आहेत. संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ