- जाहिरात -spot_img

आयुक्त मुंढेंच्या बदलीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम…..

आमदार दाते यांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांची स्पष्ट ग्वाही

पारनेर | नगर सह्याद्री
राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट दुग्धजन्य पदार्थ, गुटखा, तंबाखू आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्य वस्तूंविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र, आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पावसाळी अधिवेशन 2026 दरम्यान आमदार दाते यांनी राज्यातील वाढत्या भेसळीच्या प्रकारांकडे सरकारचे लक्ष वेधले. मे आणि जून महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर टाकलेल्या धाडीत भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, पेढा, गुळ, चहा पावडर, आंबा पिकविण्याची पावडर, गुटखा, तंबाखू, सुगंधी सुपारी, मावा तसेच इतर निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. तसेच अशा कारवायांमुळे विभागाचा दबदबा वाढला असून राज्यातील भेसळ माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार दाते यांनी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक मोहिमेचा उल्लेख करत, ही मोहीम पुढेही सुरू राहणार का आणि आयुक्तांची बदली करण्याचा कोणताही विचार शासनाच्या पातळीवर आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत राज्यभरातून 1,930 नमुने विलेषणासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच शासकीय व वैद्यकीय संस्थांमध्ये वापरासाठी आणण्यात आलेल्या निर्जंतुक न केलेल्या सर्जिकल साहित्याचा 74 लाख 85 हजार 500 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. भेसळ रोखण्यासाठी विभागाकडून कठोर कारवाई सुरू असून ती यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी सबंधित आयुक्तांची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ठाम विधान केले.

हे सुद्धा वाचा :  सावेडीगावचा सिटी सर्व्हे करा; नगरसेवकांनी नगररचनाकारांना धरले धारेवर
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com