- जाहिरात -spot_img
breaking news

गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण….

शहाजापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई

सुपा | नगर सह्याद्री
दुर्गम खेडेगाव असलेल्या शहाजापूर गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, नागरिकांकडे कुणाचेच लक्ष्य नाही. टँकर मागणी न केल्याने महिलांना रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

पारनेर तालुक्यातील दुर्गम खेडेगाव असलेल्या शहाजापूर गावात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जनतेकडे स्थानिक पुढाऱ्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला असल्याने ग्रामपंचायतवर प्रशासक राज आहे. शहाजापूरला इतर कुठल्या ठिकाणाहून पाणी आणण्याची सोय नाही. गावालगचे नैसर्गिक स्रोत तीन महिन्यांपासून कमी होत चालले असतानाच ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरने पाणी मागणीचा प्रस्ताव करणे आवश्यक होते परंतु आज मे महिना संपत आला असताना देखील गावात पाणी टँकर येत नाही. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

याबाबत शहाजापूरच्या महिलांनी सांगितले की, गावच्या बारवेचे पाणी संपले आहे. गावात पदाधिकारी नसल्याने ग्रामसेवक चार-चार दिवस गावाकडे फिरकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयच उघडत नाही तर पाणी मागायचे कुणाकडे जायचे. आज शहाजापूरमध्ये पन्नास रुपयाला एक टिपाड (बॅरल) पाणी विकत घ्यावे लागत असल्यो महिलांनी सांगितले. चहुबाजुने डोंगरांनी वेढलेल्या शहाजापूर गावात तसे नैसर्गिक पाणी स्रोत बरे आहेत. परंतु यावष उन्हाळा जास्त कडक असल्याने विहिरी, बोअरवेल आटले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता पाहून शासनाकडे वेळेत पाणी टँकर मागणे आवश्यक असताना तशी मागणी केली नाह. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्यात महिलांंना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा :  केडगावात राडा, बाप-लेकावर हल्ला, मंदिर विश्वस्तावर जीवघेणा हल्ला, भाडेकरूंना धमकावले, कुठे काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ