- जाहिरात -spot_img
breaking news

ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्कातंत्र!; काय घडलं पहा…

खासदार एनडीएच्या संपर्कात
मुंबई | नगर सह्याद्री

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून खळबळजनक वृत्त समोर आले असून ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस्च्या (शरदचंद्र पवार) खासदारांमध्येही मोठी अस्वस्थता आणि चलबिचल सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही फुटण्याची शयता आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीमधील काही महत्त्वाचे खासदार एनडीएच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे काही खासदार थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षांतराचे नवे वारे वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेमके किती खासदार एनडीए किंवा सत्ताधारी गटाच्या संपर्कात आहेत, याची कोणतीही अधिकृत आकडेवारी किंवा नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. परंतु, राजकीय गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ३ खासदार या प्रक्रियेत सक्रिय असून ते सत्ताधार्‍यांच्या संपर्कात असल्याचे समजते. आगामी काळातील राजकीय घडामोडी पाहता हा आकडा आणखी वाढण्याची दाट शयता नाकारता येत नाही. संपर्कात असलेले हे ३ खासदार कोण आहेत आणि ते कधी जाहीर पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र असतानाच, अचानक घडलेल्या या अंतर्गत घडामोडींमुळे विरोधी पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनंतर आता थेट पवारांच्या निष्ठावंत समजल्या जाणार्‍या खासदारांमध्येही बिघाडी सुरू झाल्याने, महाविकास आघाडीच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपल्या पक्षातील खासदारांना रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता अंतर्गत पातळीवर हालचाली आणि मनधरणी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा :  व्यापाऱ्याचं फिल्मीस्टाईल अपहरण; पोलिसांनी टोलनाक्यावर आरोपींचा केला खेळ खल्लास!
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ