ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांचा बसस्थानकावर निषेध
पाथर्डी | नगर सह्याद्री
दिल्ली येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ करंजी बसस्थानक येथे ग्रामपंचायत करंजी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित घटनेचा निषेध नोंदवून विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, छानराज क्षेत्रे, चंद्रशेखर अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ अकोलकर, माजी उपसरपंच सुनील अकोलकर, अभय गुगळे, माजी उपसरपंच गणेश अकोलकर, अंबादास नजन, अर्जुन भिटे, बाळासाहेब अकोलकर, राजेंद्र अकोलकर, बद्रीनाथ अकोलकर, झुंबर क्षेत्रे, संपत क्षेत्रे, सुभाष अकोलकर, विकास क्षेत्रे, अशोक चव्हाण, पप्पू अकोलकर, पवन क्षेत्रे, रामा शिंदे, बाबा क्षेत्रे, फिलिप क्षेत्रे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्याथ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचा सन्मान राखला जावा : शेख
आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा सन्मान राखण्याची गरज असल्याचे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भैया शेख यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांवरील अन्यायाबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असेही शेख यांनी यावेळी नमूद केले.










