- जाहिरात -spot_img
breaking news

भारताला मोठा दिलासा! मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पहा काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री –
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाची वाहतूक करणारे पहिले जहाज सुरक्षितपणे मुंबईमध्ये पोहचले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आणि भारतात दाखल झाले त्यामुळे आता इंधन पुठव्याबाबतची चिंता कमी झाली. लायबेरियाचा ध्वज असलेले हे जहाज धोकादायक जलमार्गातून सुरक्षितपणे मुंबई बंदरावर दाखल झाले. भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वाखाली हे जहाज तणावपूर्ण परिस्थितीमध्ये भारतात आले.

शेनलाँग सुएझमॅक्स नावाच्या या जहाजाने १ मार्च रोजी सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरावर कच्चे तेल भरले आणि ३ मार्च रोजी हे जहाज या बंदरावरून निघाले. लॉयड्स लिस्ट इंटेलिजेंस अँड टँकर ट्रॅकर्स या सागरी डेटा फर्म्सच्या मते, ८ मार्च रोजी त्याचे शेवटचे स्थान होर्मुझच्या सामुद्रधुनीत होते. त्यानंतर जहाज रडारवरून गायब झाले होते. धोक्याच्या क्षेत्रातून जाताना शोध टाळण्यासाठी जहाजाने त्याचे ट्रान्सपॉन्डर आणि एआयएस (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम) बंद केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ९ मार्च रोजी ते ट्रॅकिंग डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे पुन्हा दिसले.

बंदर अधिकाऱ्याने सांगितले की, हे जहाज बुधवारी दुपारी १ वाजता मुंबईत पोहोचले. संध्याकाळी ६:०६ वाजता ते बंदरात उतरले. हे जहाज १,३५३,३५ मेट्रिक टन कच्चे तेल मुंबईत घेऊन आले आहे. ते जवाहर बेटावर उभे करण्यात आले आहे आणि अनलोडिंग ऑपरेशन्स सुरू झाले आहे. जे पूर्ण होण्यासाठी अंदाजे ३६ तास लागतील.

इराणवरून आलेले कच्चे तेल पूर्व मुंबईतील माहूल येथील रिफायनरीजमध्ये पाठवले जाईल. या जहाजावर २९ भारतीय, पाकिस्तानी आणि फिलिपिनो क्रू मेंबर्स आहेत. त्याचा कॅप्टन भारतीय वंशाचा सुशांत सिंग संधू आहे. हे जहाज शेनलाँग शिपिंग लिमिटेडच्या मालकीचे आहे. तर अथेन्सस्थित कंपनी डायनाकॉम टँकर्स मॅनेजमेंटद्वारे हे जहाज चालवले जाते.

हे सुद्धा वाचा :  ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्कातंत्र!; काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ