- जाहिरात -spot_img
breaking news

७/१२  नसतानाही ११ शेतकर्‍यांचे लाटले अनुदान; पारनेरमध्ये काय घडलं पहा…

तक्रारीअंती योजनेचा अनागोंदी कारभार उघड
पारनेर | नगर सह्याद्री

तालुक्यातील खडकवाडी येथील ११ शेतकर्‍यांच्या नावावर शेती अथवा सातबाराची नोंद नसताना बोगस कागदपत्रांच्या आधारे पंतप्रधान किसान सन्मान निधीचे ८ हप्ते अनुदान लाटले असल्याची माहिती तक्रार अर्जाच्या चौकशी अंती उघड झाली आहे.

खडकवाडीचे माजी उपसरपंच अक्षय बाबाजी ढोकळे यांनी आपले सरकार या पोर्टलवर १७ जानेवारी २०२६ रोजी यासंबंधी तक्रार दाखल केली होती तक्रारी अंती योजनेचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. एका गावातील हा योजनेचा नमुना असून पारनेर तालुयातही अनेक बोगस लाभार्थी असण्याची शयता आता या माध्यमातून व्यक्त होऊ लागली आहे. सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले असून यामध्ये काही सेतूचालकांचाही सहभाग असण्याची शयता व्यक्त केली जात आहे.

या तक्रारीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी चौकशी केली असता या ११ लाभार्थ्यांच्या नावावर कोणतीही जमीन अथवा ७/१२ आढळून आला नाही त्यामुळे संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे हे अनुदान लाटले असल्याचे उघडकीस आले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सबंधित अर्जाची सहाय्यक कृषी अधिकारी खडकवाडी यांच्या मार्फत छाननी केली असता सदरच्या १२ लाभार्थी पैकी ११ लाभार्थी यांच्या नावावर  ७/१२ व फेरफार नाही, असा अहवाल  २ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला आहे.

लाभार्थी यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर लाभार्थी यांची ऑनलाईन पडताळणी केली असता लाभार्थी यांचा लाभ चालू व बंद करण्याची प्रक्रिया ही १५ जून २०२३ पूर्वीच केलेचे निदर्शनास आलेले आहे. सदरच्या योजनेचे कामकाज त्यापूर्वी महसूल विभागाकडे होते. तद्नंतर शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग यांचेकडील १५ जून २०२३ आदेशानुसार कृषी विभागास हस्तातरीत केलेले आहे.  या आदेशानुसार अपात्र लाभार्थी यांच्या लाभाच्या वसुली बाबतचे कामकाज हे महसूल विभागाकडेच असून अपात्र लाभार्थी यांचे रक्कम वसूली बाबतची अधिकार या कृषी कार्यालयास नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :  राजहंस दूध संघात प्रतिदिन 1350 वीज युनिट निर्मिती होणार

वसुलीचे अधिकार महसूल विभागाकडे
खडकवाडी येथील ११ लाभार्थ्यांच्या नावे जी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्यावेळीे अधिकार हे महसूल विभागाला होते. सन २०२३ नंतर हे अधिकार कृषी विभागाला आलेले असून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले अनुदान रक्कम वसुलीचे अधिकार हे महसूल विभागाला आहे.
-गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी, पारनेर

ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचाही लाभार्थ्यांमध्ये समावेश
पारनेर तालुयातील खडकवाडी येथील ११ बोगस लाभार्थ्यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या लाभार्थ्यांनी सन २०२० ते २०२२ पर्यंत आवश्यक संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला असून ८ हप्ते तर काहींनी ३ हप्ते या लाभार्थ्यांच्या नावावर जमा करण्यात आले आहे. यामध्ये खडकवाडी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ