- जाहिरात -spot_img
breaking news

विदर्भ हादरला; पत्नीला माहेर सोडलं, 4 मुलांना विहिरीत ढकलून वडिलांनीही संपवलं जीवन…

बुलढाणा / नगर सह्याद्री –
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातून मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील व्यक्ती हा आदिवासी समाजाचा असून त्याने आपल्या चार मुलांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित मृत व्यक्ती असून आज सकाळी त्याने पत्नीला माहेरी सोडलं. त्यानंतर, गावी परत येताना त्याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा :  राष्ट्रवादी काँग्रेसने नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ