- जाहिरात -spot_img
breaking news

मनपातील बहुमतामुळे प्रभागातील प्रश्न सुटणार : उपमहापौर काय म्हणाले पहा

नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्णनगरमध्ये सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महापालिकेत मिळालेल्या बहुमतामुळे शहरात सर्वच प्रभागात विकास कामे झपाट्याने होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध करुन दिला जात आहे. शहरात विकासाची गंगा वाहती झाली आहे. दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे नगरसेवक कायम तत्पर असून, प्रभाग ९ मध्ये पै. महेश लोंढे यांचे उत्तम प्रकारे विकासकामाचे नियोजन व कार्य सुरु असल्याचे उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी सांगितले.

नगर-कल्याण रोड प्रभाग क्रमांक ९ मधील श्रीकृष्ण नगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी महापालिका स्थायी समितीचे सभापती पै. सुभाष लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक निखिल वारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, अभिजीत बोरुडे, सुषमा गोळे, सुनीता कर्डिले, विशाखा मिसाळ, पल्लवी बुगे, हिराबाई गोरे, लताबाई लोंढे, राधाबाई अंधारे, रंजना ढवळे, सुभद्रा कुकाटे, आशा गोरे, सुनील वाव्हळ, प्रभाकर कोंडा, अशोक बुगे, भगवान ढवळे, आप्पा कदम, खांदवे सर, सखाराम गोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, महापालिकेत मिळालेल्या बहुमतामुळे शहरात सर्वच प्रभागात विकास कामे झपाट्याने होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध करुन दिला जात आहे. शहरात विकासाची गंगा वाहती झाली आहे. दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे नगरसेवक कायम तत्पर असून, प्रभाग ९ मध्ये पै. महेश लोंढे यांचे उत्तम प्रकारे विकासकामाचे नियोजन व कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल मोहिते म्हणाले की, श्रीकृष्ण नगर परिसरात चांगले सभामंडप उभारले जात आहे. या सभामंडपाचा स्थानिक नागरिकांना सांस्कृतिक भवन म्हणून उपयोग होणार आहे. आरसीसी बांधकाम असल्याने छोटे-मोठे कार्यक्रम होईल आणि त्यापुढे देखील आणखी मजले उभारून विविध सुविधा निर्माण करता येणार आहे. जनतेने महायुतीला दिलेले बहुमत विकास कामातून उतराई केली जात आहे. विकास कामासाठी राज्य व केंद्र सरकार शहराच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा :  शिंगोरीचा हर्षद चेमटे ठरला एशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णविजेता

महेश लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सुटणार ः पै. सुभाष लोंढे
पै. सुभाष लोंढे म्हणाले की, राजकारण व समाजकारणाचा वारसा लाभलेले महेश लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सुटणार आहे. शहरातील मुलभूत प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून मिळत असलेल्या निधीमुळे विकासकामे झपाट्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण व समाजकारणाचे धडे घेऊन पहिल्यांदा नगरसेवक झालेले पै. महेश लोंढे नागरिकांच्या समस्येवर विशेष लक्ष देत आहे. आपल्या कार्यातून त्यांनी विकासकामांद्वारे लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ