- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं पहा

| चार जणांविरोधात गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील नगर-मनमाड रोडलगत असलेल्या ॲक्यूम मसाज पार्लर / स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मध्यरात्री छापा टाकून देहविक्रीचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक, मॅनेजर, मदतनीस आणि एका ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई दि. 27 मे रोजी रात्री उशिरा करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नगर-मनमाड रोडवरील साई मिडास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ॲक्यूम स्पा सेंटरमध्ये महिलांना मसाज सेंटरच्या नावाखाली बोलावून देहविक्रीस भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. बनावट ग्राहकाकडे 500 रुपयांच्या आठ नोटा देण्यात आल्या होत्या. ग्राहकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन शरीरसंबंधासाठी महिलेची मागणी केल्यानंतर पोलिसांना खात्री पटली आणि रात्री सुमारे 11.35 वाजता पोलिस पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये दोन कर्मचारी आढळून आले. त्यांची नावे अनिकेत अशोक बचाटे (रा. करमाळा, जि. सोलापूर) व काळुराम भिमा समिंदर (रा. शिरूर, जि. पुणे) अशी आहेत. चौकशीत स्पा सेंटरचा मालक संतोष गणेश बघे (रा. संभाजीनगर) असल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या झडतीत रोख रक्कम, बनावट ग्राहकाकडून देण्यात आलेल्या नोटा, चार मोबाईल हँडसेट, इतर साहित्य असा एकूण 60 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.स्पा सेंटरमधील वेगवेगळ्या रूमची तपासणी केली असता एका खोलीत बनावट ग्राहकासोबत महिला आढळून आली. तसेच दुसऱ्या खोलीत एक ग्राहक आणि महिला मिळून आले. आणखी दोन महिला स्टाफ रूममध्ये आढळून आल्या.

चौकशीत संबंधित महिलानी स्पा सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींकडून महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीस भाग पाडले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी संतोष गणेश बघे, अनिकेत अशोक बचाटे, काळुराम भिमा समिंदर आणि ग्राहक सजन एस. यांच्याविरोधात विविध कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईदरम्यान तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, पोउपनिरीक्षक तुषार धाकराव, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे कर्मचारी, होमगार्ड तसेच पंच उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  पाणी पुरवठा विस्कळीत, नगरसेवक आक्रमक, प्रशासन धारेवर, कर्मचाऱ्यांना इशारा....
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ