- जाहिरात -spot_img
breaking news

वाकचौरेंना मतदारसंघात फिरू देणार नाही; कोणी दिला इशारा, आ. अमोल खताळ म्हणाले…

ठाकरे सेनेचा इशारा | श्रीरामपूरमध्ये रास्ता रोको
श्रीरामपूर | नगर सह्याद्री

शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली असून, त्यांना मतदारसंघात फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाकरे सेनेच्यावतीने बेलापूर येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान खासदार वाकचौरे यांच्या समर्थनार्थ आता शिंदेंची शिवसेना मैदानात उतरली असून, खासदार वाकचौरेंना विरोध केला तर आम्ही ढाल बनून उभे राहू. आमच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या घातलेल्या नाहीत असा इशारा शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.

केंद्रातील कथित ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव समोर येताच शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी एकत्र येत वाकचौरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली असून त्यांना गद्दार संबोधत मतदारसंघात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाकचौरे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या विश्वासाला तडा देणार्‍या नेत्यांना शिवसैनिक माफ करणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच श्रीरामपूर येथील ठाकरे सैनिकही आक्रमक होत रस्तारोको आंदोलन केले. वाकचौरे यांना मतदारसंघात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. त्याविरोधात शिंदेसेनेचे समर्थक खासदार वाकचौरे यांच्या पाठिंशी उभे राहिले असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा :  जनावरांच्या घाणीमुळे रुग्णालय परिसरात दुर्गंधी,
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ