- जाहिरात -spot_img

गुन्हेगारांशी संबंध; पोलीस हवालदार शंकर चौधरी निलंबित

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्रीरामपूर येथील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा गंभीर आरोप असलेल्या पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. श्रीरामपूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. निलंबित शंकर चौधरी हा सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता, तर यापूव त्याची नेमणूक श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आली होती.

गुटखा तस्करीशी संबंधित कथित हप्तेखोरीच्या आरोपांनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्याची बदली पोलीस मुख्यालयात केली होती, मात्र तरीही त्याच्या तक्रारी सुरूच होत्या. श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या खुनानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून सलग तीन दिवस शहरात कडक बंद पाळण्यात आला. याच दरम्यान दरोडे, खून, वाळू तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला होता.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस अंमलदार शंकर चौधरी याचे नाव समोर आले असून त्याचे सराईत गुन्हेगारांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वैजापूर परिसरातील वाळू तस्करांनी एका शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीच्या व्हिडिओमध्ये देखील गुन्हेगारांनी चौधरीचे नाव घेतल्याने हा वाद अधिकच चिघळला होता. गुन्हेगारांशी असलेल्या अशा कथित संबंधांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी ही निलंबनाची कारवाई करून गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अवैध धंदेवाल्यांना एक प्रकारे कडक इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  आता मागे हटणार नाही; शेतातच टाकली बाज, मनोज जरांगे पाटलांचे भर उन्हात उपोषण सुरू
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com