- जाहिरात -spot_img
breaking news

पंढरपूरमध्ये राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, हाणामारी, यात्रेला गालबोट!, काय घडलं पहा…

पंढरपूर / नगर सह्याद्री –
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्या डान्सची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.

सुस्ते गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर राधा पाटील हिचा भव्य नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरळीत सुरू होता आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही वेळातच मारामारीत बदलला.

पोलिसांची तात्काळ कारवाई
वाद वाढत गेल्याने संबंधित तरुणांमध्ये धक्काबुक्की, आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर काही जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या गोंधळामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वाढता तणाव पाहता आयोजकांनी राधा पाटील हिचा कार्यक्रम तात्काळ बंद केला. पोलिसांनी गर्दी पांगवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

दोन दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम
विशेष म्हणजे, याच सुस्ते गावात दोन दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रचंड गर्दी होऊनही कार्यक्रम पूर्णपणे शांततेत पार पडला होता. त्यामुळे दोन कार्यक्रमांमधील परिस्थितीतील हा फरक चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील दोन वेगवेगळ्या राजकीय गटांनी स्वतंत्रपणे हे कार्यक्रम आयोजित केले होते. एका गटाने गौतमी पाटील हिचा तर दुसऱ्या गटाने राधा पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या घटनेला कोणताही राजकीय रंग नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

किरकोळ कारणावरून झालेल्या या वादामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आणि यात्रेच्या वातावरणाला गालबोट लागले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  खुशखबर! मान्सून केरळमध्ये धडकला, दोन दिवसात महाराष्ट्रात...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ